बेरोजगारी वाढली, हाताला कामच नाही, महागाईने हिसकावला घास; महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक

योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश आणि जगाला जो संदेश दिला तो ज्यांच्याकडे सद्यस्थितीत उदरनिर्वाहाचे साधनच नाही आणि वाढत्या महागाईमुळे त्यांच्या तोंडाचा घास हिसकावला त्यांच्यासाठी मात्र हा संदेश बिनकामाचा आहे. आर्थिक व्यवहाराची गती मंद असल्यामुळे देशात बेरोजगारीत सातत्याने वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 45.6 टक्क्यांवर बेरोजगारीत वाढ झाली असून जवळपास प्रत्येक दुसरा व्यक्ती बेरोजगार आहे तर हरयाणा आणि राजस्थानात तर प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीच्या हाताला कामच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे.

  दिल्ली : योग दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश आणि जगाला जो संदेश दिला तो ज्यांच्याकडे सद्यस्थितीत उदरनिर्वाहाचे साधनच नाही आणि वाढत्या महागाईमुळे त्यांच्या तोंडाचा घास हिसकावला त्यांच्यासाठी मात्र हा संदेश बिनकामाचा आहे. आर्थिक व्यवहाराची गती मंद असल्यामुळे देशात बेरोजगारीत सातत्याने वाढ होत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 45.6 टक्क्यांवर बेरोजगारीत वाढ झाली असून जवळपास प्रत्येक दुसरा व्यक्ती बेरोजगार आहे तर हरयाणा आणि राजस्थानात तर प्रत्येक तिसऱ्या व्यक्तीच्या हाताला कामच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे.

  अनिश्चिततेचे वातावरण

  बाजारात तूर्त अनिश्चिततेचे वातावरण आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल होत असून बाजारही सुरू करण्यात आले आहे व लोकांचीही गर्दी वाढू लागली आहे. तथापि लोकांच्या हाती रोख रकमा नसल्यानेच अधिक खर्च करण्यास मागेपुढे विचार केला जात आहे त्यामुळे बाजारात सध्या तेजी आलेली नाही. यासोबतच कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेमुळेही अनिश्चितता पसरली आहे. त्यामुळे अनेक जण बाजारात पैसे गुंतविण्यासही विचा करीत आहेत. त्यांना संभाव्य लॉकडाऊनची भीतीही आहे. तसे झाल्यास त्यांचा पैसा बाजारात अडकण्याची शक्यता आहे.

  समस्या सुटण्याच्या मार्गावर

  देशाच्या विविध भागात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे आर्थिक व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीतही घट झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात आतापर्यंत बेरजोगारीत घट झाली आहे. ग्रामीण क्षेत्रात धान रोवणीचे काम सुरू झाल्यामुळेही बेरोजगारीत घट झाली आहे. दिल्लीसह अन्य राज्येही हळुहळू अनलॉक होत आहेत त्यामुळे बेरोजगारीच्या टक्केवारीत घट अपेक्षित आहे.

  हे सुद्धा वाचा