पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले, केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी केलं मोठं वक्तव्य

सध्या सर्वांचंच लक्ष पेट्रोल डिझेलचे दर कमी केव्हा होणार याकडे लागलं असताना हे दर सध्या तरी कमी होणार नसल्याचे संकेत हरदीप सिंह पुरी यांनी दिले आहेत. शनिवारी दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी हरदीप सिंह पुरी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे.

    नवी दिल्ली –  गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली. वाढत्या दरांमुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी पेट्रोल डिझेलच्या दराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

    सध्या सर्वांचंच लक्ष पेट्रोल डिझेलचे दर कमी केव्हा होणार याकडे लागलं असताना हे दर सध्या तरी कमी होणार नसल्याचे संकेत हरदीप सिंह पुरी यांनी दिले आहेत. शनिवारी दिल्लीतील एका कार्यक्रमासाठी हरदीप सिंह पुरी उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी याबद्दल वक्तव्य केलं आहे.

    कार्यक्रमात बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, कोरोना महामारीचं संकट येण्यापूर्वीच्या तुलनेत आज पेट्रोल आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशात पेट्रोलचा वापर 10-15 टक्के तर डिझेलचा वापर 6-10 टक्क्यांनी वाढला आहे.