आजची बैठक ही मोदी किंवा भाजपविरोधातील नव्हती, आम्ही देशाला ‘व्हिजन’ देऊ ; राष्ट्रमंचच्या नेत्यांचा दावा

आजची बैठक ही मोदी किंवा भाजपविरोधातील नव्हती. पवारांच्या घरी बैठक झाली, पण पवारांनी बैठक बोलावली नव्हती. ही राष्ट्रमंचची बैठक होती. आम्ही त्याचे सदस्य म्हणून त्यात सहभागी झालो होतो, असं माजिद मेमन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. पवार तिसरी आघाडी करत असून काँग्रेसला एकटं पाडलं जात आहे, अशी चर्चा आहे. तीही चुकीची आहे. या बैठकीला काँग्रेसच्या पाच खासदारांना आमंत्रण दिलं होतं.

    नवी दिल्ली: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रमंचच्या नेत्यांची अडीच तास बैठक झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अॅड. माजिद मेमन, पवन वर्मा आणि समाजवादी पार्टीचे प्रवक्ते घनश्याम तिवारी यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती दिली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक तिसऱ्या आघाडीसाठी नव्हती. भाजपविरोधी आघाडी निर्माण करण्याचा आणि या बैठकीचा काहीच संबंध नव्हता. देशात अनेक मुद्दे आहेत. पण व्हिजन नाही. देशाला व्हिजन देण्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा झाली असून आम्ही देशाला व्हिजन देऊ, असा दावा राष्ट्रमंचच्या नेत्यांनी केला आहे.

    आजची बैठक ही मोदी किंवा भाजपविरोधातील नव्हती. पवारांच्या घरी बैठक झाली, पण पवारांनी बैठक बोलावली नव्हती. ही राष्ट्रमंचची बैठक होती. आम्ही त्याचे सदस्य म्हणून त्यात सहभागी झालो होतो, असं माजिद मेमन यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं. पवार तिसरी आघाडी करत असून काँग्रेसला एकटं पाडलं जात आहे, अशी चर्चा आहे. तीही चुकीची आहे. या बैठकीला काँग्रेसच्या पाच खासदारांना आमंत्रण दिलं होतं.

    कपिल सिब्बल, शत्रुघ्न सिन्हा आणि अभिषेक मनू सिंघवी यांनाही बोलावण्यात आलं होतं. त्यामुळे काँग्रेसने बहिष्कार टाकला किंवा काँग्रेसला एकटं पाडलं या वृत्तात काही तथ्य नाही, असं सांगतानाच देशातील सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावरही चर्चा झाली. ही राजकीय बैठक नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.