जिथे कोरोनाचे प्रमाण जास्त, तेथे चाचण्या वाढवा; महाराष्ट्रासह 13 राज्यांना निर्देश

देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून लसीकरणाबाबत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह 13 राज्यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तिथे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे आवाहन केले आहे(Where corona levels are high, increase tests; Instructions to 13 states including Maharashtra).

    दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी केंद्र सरकारने राज्यांना पत्र पाठवून लसीकरणाबाबत काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह 13 राज्यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि मृत्यूचे प्रमाण जास्त आहे तिथे कोरोना चाचण्यांमध्ये वाढ करण्याचे आवाहन केले आहे(Where corona levels are high, increase tests; Instructions to 13 states including Maharashtra).

    भूषण यांनी महाराष्ट्र, नागालँड, सिक्कीम, केरळ, गोवा, मणिपूर, मेघालय, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, राजस्थान, पश्चिम बंगाल, लडाख या राज्यांना पत्र लिहिले आहे.

    जगातील इतर देशांमध्ये चौथ्या आणि पाचव्या लाटेचा हाहाकार सुरू असल्याचे भूषण यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच आता हिवाळ्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घ्या असं राज्यांना राजेश भूषण यांनी सांगितले आहे.