
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच, देशभरातील रस्त्यांवर टोलही वसूल केला जात आहे. या दुहेरी कात्रीत सर्वसामान्य जनता भरडली जात असताना आमदार, खासदार मात्र टोल न भरता प्रवास करतात. त्यामुळे सर्वसामान्य जनता टोल भरत असताना लोकप्रतिनिधी टोल का देत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडतो. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनीच आता एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात या प्रश्नाचे उत्तर दिले. सर्वांना सवलत देणे शक्य नाही, असे कारण गडकरींनी यामागे दिले(why MLAs, MPs do not have to pay tolls; Nitin Gadkari said the real reason behind this).
दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात प्रचंड वाढ झाली आहे. अशातच, देशभरातील रस्त्यांवर टोलही वसूल केला जात आहे. या दुहेरी कात्रीत सर्वसामान्य जनता भरडली जात असताना आमदार, खासदार मात्र टोल न भरता प्रवास करतात. त्यामुळे सर्वसामान्य जनता टोल भरत असताना लोकप्रतिनिधी टोल का देत नाहीत, असा प्रश्न अनेकांना पडतो. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनीच आता एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात या प्रश्नाचे उत्तर दिले. सर्वांना सवलत देणे शक्य नाही, असे कारण गडकरींनी यामागे दिले(why MLAs, MPs do not have to pay tolls; Nitin Gadkari said the real reason behind this).
चांगले रस्ते हवे असतील तर पैसे द्यावे लागतील
ट्रॅक्टरने शेतमाल नेणारे शेतकरी, लष्करी वाहने, रुग्णवाहिका, खासदार आणि आमदारांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. सर्वसामान्य जनतेला मात्र टोल भरल्याशिवाय प्रवास करता येत नाही. कारण, सर्वांना सवलत देणे शक्य नाही, असे गडकरी म्हणाले. चांगले रस्ते हवे असतील तर पैसे द्यावे लागतील, असेही त्यांनी सांगितले. आधी लोक वाहतूक कोडींत अडकायचे. त्यामुळे पेट्रोल, डिझेलवर अधिक पैसा खर्च व्हायचा. आता रस्ते चांगले असल्यानं पैसा वाचतो. मग त्या बदल्यात टोल भरण्यात काय अडचण आहे, असा सवाल गडकरींनी उपस्थित केला.
जनतेच्या पैशातून रस्ते तयार करणार
सरकार रस्ते तयार करण्यासाठी पैसे उधार घेते. त्याची परतफेड करून त्यावर व्याजही द्यावे लागते. याचसाठी टोल घ्यावा लागतो. आता सरकार देशातील सर्वसामान्य लोकांच्या पैशातून रस्ते तयार करेल. सर्वसामान्य माणूस बँकेत पैसे ठेवतो, त्यावर किती व्याज मिळते? तुम्ही रस्ते तयार करण्यासाठी पैसे दिल्यास सरकार त्यावर तुम्हाला अधिक व्याज देईल असे नितीन गडकरी म्हणाले.
देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस हायवे
दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या बांधणीसाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी बॉन्डच्या स्वरूपात पैसे घेतले जातील, असे गडकरी म्हणाले. देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस हायवे तयार होत आहेत. दोन वर्षांत दिल्ली ते श्रीनगर प्रवास साडे आठ तासांत शक्य होईल, अशी माहिती त्यांनी दिली.