पूर्णपणे सर्वनाश होणार; कोरोनावर येणार ‘सुपर व्हॅक्सीन’

जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून नवनव्या व्हेरिएंटचीही त्यात भर पडत आहे. वेगवेगळ्या देशात वेगवेगळे व्हेरिएंट समोर आल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे परंतु आता शास्त्रज्ञ सर्वच व्हेरिएंटवर ‘रामबाण’ ठरणारी व्हॅक्सीन तयार करण्याचा प्रयत्न करीत आहत. यासोबतच भविष्यात येणारी साथरोगाची लाटही रोखण्यास मदत होईल. शास्त्रज्ञांनी एक अशी व्हॅक्सीन तयार केली आहे जी कोविड-19 शिवाय कोरोनाच्या अन्य सर्व व्हेरिएंटवरही उपयोगी आहे. तूर्त याची चाचणी शास्त्रज्ञांनी उंदरांवरच केली आहे.

  दिल्ली : जगात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले असून नवनव्या व्हेरिएंटचीही त्यात भर पडत आहे. वेगवेगळ्या देशात वेगवेगळे व्हेरिएंट समोर आल्याने चिंताही व्यक्त केली जात आहे परंतु आता शास्त्रज्ञ सर्वच व्हेरिएंटवर ‘रामबाण’ ठरणारी व्हॅक्सीन तयार करण्याचा प्रयत्न करीत आहत. यासोबतच भविष्यात येणारी साथरोगाची लाटही रोखण्यास मदत होईल. शास्त्रज्ञांनी एक अशी व्हॅक्सीन तयार केली आहे जी कोविड-19 शिवाय कोरोनाच्या अन्य सर्व व्हेरिएंटवरही उपयोगी आहे. तूर्त याची चाचणी शास्त्रज्ञांनी उंदरांवरच केली आहे.

  पूर्व तयारी करणे आवश्यक

  अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यावर संशोधन सुरू केले आहे. सद्यस्थितीत कोणता विषाणू कोणता साथरोग निर्माण करेल याबाबत अनभिज्ञता असली तरी त्यासाठी पूर्व तयारी करावी लागेल, असे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपूर्वीच ही व्हॅक्सीन उपलब्ध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

  सर्व विषाणूंवर मारक ठरणार

  जे विषाणू प्राण्यांमधून मनुष्यापर्यंत पोहोचतात त्या व्हेरिएंटलाही ही व्हॅक्सीन मारक ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. ही व्हॅक्सीन कोरोना विषाणूच्या सर्व व्हेरिएंटला मारक असल्याचेही त्यांनी सांगितले.

  संशोधनाचे निष्कर्ष

  • दुसऱ्या पीढीची व्हॅक्सीन असल्याचे सांगण्यात आले आहे.
  • ही व्हॅक्सीन सर्बेकोव्हायरसवर हल्ला करते. हा विषाणू कोरोनाचाच प्रकार आहे. याच श्रेणीतील दोन व्हेरिंटने जगभरात धुमाकूळ घातला आहे. पहिला सार्स आणि दुसरा कोविड-19.
  • संशोधनावेळी शास्त्रज्ञांनी एमआरएनए तंत्रज्ञान वापरले. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने फायझर आणि मॉडर्नाने लस तयार केली आहे.

  मानवावर चाचणी केव्हा?

  • उंदरांवर करण्यात आलेल्या चाचणीअंती या लसीने अशा अँटीबॉडी (रोगप्रतिकार शक्ती) तयार केल्या ज्या अनेक समस्यांवर मात करू शकतात. यात दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या बी.1.351 सारख्या व्हेरिएंटचाही समावेश आहे.
  • या व्हॅक्सीनमध्ये कोणत्याही प्रकारचा विषाणूचा हल्ला रोखण्याची शक्ती असेल. ज्या उंदरांवर चाचणी करण्यात आली ते सार्स कोव्ही व अन्य कोरोना विषाणूने ग्रस्त होते.
  • तूर्त या व्हॅक्सीनची चाचणी सुरू असून पुढील वर्षीपर्यंत मानवावर या व्हॅक्सीनची चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे.