coronavirus vaccine severe allergic reaction in us health worker minutes after pfizer shot

ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवे प्रकार आढळून आल्याने जगभरात दहशत पसरली आहे. अशा परिस्थितही कोरोना लसीबाबत मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूंविरोधातही लस प्रभावी ठरतील. भारताचे प्रधान वैज्ञानिक सल्लगार प्रा. के. विजय राघवन यांनी हे मत व्यक्त केले आहे.

दिल्ली : ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेत कोरोना विषाणूचे नवे प्रकार आढळून आल्याने जगभरात दहशत पसरली आहे. अशा परिस्थितही कोरोना लसीबाबत मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूंविरोधातही लस प्रभावी ठरतील. भारताचे प्रधान वैज्ञानिक सल्लगार प्रा. के. विजय राघवन यांनी हे मत व्यक्त केले आहे.

कोरोना प्रतिबंधक लस ब्रिटन आणि दक्षिण अफ्रिकेत आढळून आलेल्या नव्या विषाणूविरोधातही काम करेल. सध्याची लस करोनाच्या या नव्या विषाणूंपासून वाचवण्यास अपयशी ठरतील याचा कुठलाही पुरावा नाही असे राघवन म्हणाले.

आपण विषाणूवर खूपच अधिक प्रमाणात रोगप्रतिकार दबाव टाकता कामा नये. आपल्याला अशा थेरपीचा प्रयोग करायला हवा जी आपल्याला फायदा मिळवून देईन. जर यामुळे फायदा होत नसेल तर आपण त्या उपचारांचा उपयोग करता कामा नये, अन्यथा या उपचारामुळे विषाणूवर अधिक दबाव आल्याने विषाणूचे उत्परिवर्तन घडून येईल असे मत आयसीएमआरच्या महासंचालकांनी व्यक्त केले.

दरम्यान, देशातील १० सरकारी प्रयोगशाळांचा हा एक संघ आहे. हा संघ कोरोनाच्या जिनोमचा अनुक्रमांसह त्या विषाणूच्या कोणत्याही प्रकाराचा अनुक्रम लावतो. या प्रयोगशाळा आयसीएमआर, बायोटेक इंडिया, सीएसआयआरशी संबंधित आहेत.