प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल पीडितांनी आरोप मागे घेण्यासाठी अधिकारी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. तक्रार मागे घ्या आणि तुमची मदत करणाऱ्या एखाद्या वकिलाविरोधात जबाब द्या, यासाठी अधिकारी आमच्यावर दबाव टाकत असल्याचे दंगल पीडितांच्या एका समूहाने म्हटले आहे. पोलिसांनी दोन दिवसापूर्वी दंगल पीडितांचे वकील महमूद प्राचा यांच्या कार्यालयातील झाडाझडती घेतली होती. यानंतर पीडितांनी एका पत्रकार परिषदेत उपरोक्त आरोप केले.

दिल्ली (Delhi). उत्तर-पूर्व दिल्लीतील दंगल पीडितांनी आरोप मागे घेण्यासाठी अधिकारी त्यांच्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप केला आहे. तक्रार मागे घ्या आणि तुमची मदत करणाऱ्या एखाद्या वकिलाविरोधात जबाब द्या, यासाठी अधिकारी आमच्यावर दबाव टाकत असल्याचे दंगल पीडितांच्या एका समूहाने म्हटले आहे. पोलिसांनी दोन दिवसापूर्वी दंगल पीडितांचे वकील महमूद प्राचा यांच्या कार्यालयातील झाडाझडती घेतली होती. यानंतर पीडितांनी एका पत्रकार परिषदेत उपरोक्त आरोप केले.

फेब्रुवारी महिन्यात दिल्लीत झालेल्या दंगलीनंतर केंद्र, राज्य सरकारसह कोणत्याही सरकारी एजंसीने आम्हाला मदत केली नाही. मात्र, अॅड. प्राचा यांनी आमच्यासोबत उभे राहून कायदेशीर मदतीसह आवश्यक ते सर्व सहाय्य नि:शुल्क केले. मात्र, आता पोलिस आणि अधिकारी आमच्यावर खटला मागे घेण्यासाठी दबाव टाकत आहे. खजुरीतील रहिवासी मोहम्मद मुमताज (27) यांनी आपल्याला खटला मागे घेण्यासाठी विवश करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

दंगलीदरम्यान पोलिस कर्मचाऱ्यांनी राष्ट्रगीत गाण्यासाठी ज्याला मारहाण केली होती, त्या वसीमने पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा आरोप केला आहे. मला जेव्हा अॅड. प्राचा यांच्याबाबत माहिती मिळाली, तेव्हा त्यांच्या मदतीमुळे पोलिसांनी माझी तक्रार दाखल करून घेतली, असेही वसीमने म्हटले आहे.