केसांना चुकीच्या ठिकाणी कात्री लावली आणि फाईव्ह स्टार हॉटेलवर अशी वेळ….

हॉटेल आयटीसी मौर्यमधील(Hotel ITC Maurya) सलूनद्वारे चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल महिलेला २ कोटी रुपयांची भरपाई(2 Crore Compensation For Wrong Haircut) देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली: सलूनमध्ये(Saloon अनेकदा आपण आपल्या आवडीचा हेअर कट करत असतो. कधी हा हेअर कट मनासारखा होतो तर कधी बिघडतो. पण सलून चालकानं आपल्या मनासारखी हेअर कट करून न दिल्यास दंड (Fine For wrong Haircut In Delhi) आकारल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का ? दिल्लीत(Delhi) अशी एक घटना उघडकीस आली आहे. हॉटेल आयटीसी मौर्यमधील(Hotel ITC Maurya) सलूनद्वारे चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल महिलेला २ कोटी रुपयांची भरपाई(2 Crore Compensation For Wrong Haircut) देण्यात आली आहे.

    हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनमध्ये २०१८ मध्ये कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं केस कापल्याबद्दल आणि चुकीची ट्रिटमेंट दिल्याबद्दल एका महिलेला राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या मध्यस्थीनं हॉटेल आयटीसी मौर्यकडून २ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. तक्रारदार महिला ही केस उत्पादनांसाठीची मॉडेल आहे. न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल आणि डॉ. एस. एम. कांतीकर यांनी याविषयी आदेश दिला आहे.

    “स्त्रिया त्यांच्या केसांच्या बाबतीत अत्यंत सावध आणि काळजी घेतात, यात शंका नाही आणि त्यांनी केस चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी एक मोठा खर्च केलाय, यातही दुमत नाही. त्या भावनिकरित्या त्यांच्या केसांशी जोडलेल्या असतात. तिच्या लांब केसांमुळे तक्रारदार महिला ही हेअर प्रॉडक्टची मॉडेल होती. तिने VLCC आणि Pantene साठी मॉडेलिंग केल आहे. पण उलटपक्ष हॉटेल आयटीसी मौर्यमधील सलूनद्वारे सूचनांविरोधात केस कापल्यामुळे तिने तिची अपेक्षित असाइनमेंट गमावली आणि तिचे नुकसान झाले. परिणामी तिची जीवनशैली पूर्णपणे बदलली आणि तिचे टॉप मॉडेल बनण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.

    १२ एप्रिल २०१८ रोजी तिने हॉटेल आयटीसी मौर्य येथील सलूनला केस कापण्यासाठी भेट दिली, कारण त्यावेळी तिला एका असाइनमेंटला जायचे होते. महिलेने तिची नियमित हेअर स्टाइल करण्यास सांगितले. पण ती उपलब्ध नव्हती आणि त्याऐवजी कर्मचाऱ्यांच्या आश्वासनावर तिला दुसऱ्या पद्धतीची हेअर स्टाइल देण्यात आली. ते पाहून संबंधित महिला आश्चर्यचकीत झाली. मागच्या बाजूने तिचे केस तळापासून ४ इंच कापण्याची सूचना असतानाही हेअर स्टाइलिस्टनं त्याहून जास्त इंच केस कापले. पण त्यामुळे तिला चांगली असाइनमेंट गमवावी लागली. तसेच केसांवरच्या उपचारांसाठी वापरलेल्या प्रोडक्टनंही तिच्या टाळूवर सूज आली आणि तिचं नुकसान झाल्याचंही निरीक्षण आयोगानं नोंदवलं.

    तिचे केस अशा पद्धतीनं कापण्यात आल्यानं तिला गंभीर मानसिक धक्का बसला आहे. ती तिच्या नोकरीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीये. आयटीसी हॉटेल्स लिमिटेडच्या चुकीमुळे तिला हा मनस्ताप सहन करावा लागतोय. गेल्या दोन वर्षांपासून ती महिला वेदना आणि आघात सहन करत आहे, असंही आयोगाने नोंदवले. या प्रकरणातील प्रतिवादींनीही युक्तिवाद केला. तक्रारदार महिलेनं नुकसानभरपाईचा केलेला दावा अतिशयोक्तीपूर्ण आणि कोणत्याही आधाराशिवाय आहे. तक्रारीमध्ये कोणताही आधार देण्यात आलेला नाही, ज्यावर नुकसानभरपाईचा दावा ३ कोटी रुपये असेल, असे प्रतिवादींनी म्हटलं आहे.