devendra fadanvis playing holi

राजकारणातून थोडासा वेळ बाजूला काढत होळीचा सण(devendra fadanvis holi photo) कुटुंबासोबत साजरा करण्यास राजकारणी प्राधान्य देताना दिसत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही कुटुंबासोबत होळी साजरी केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचा होळीचा (holi)एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

    गेले काही दिवस मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि सचिन वाझेंकडून होणारे नवनवे गौप्यस्फोट यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळाच रंग चढला आहे. मात्र आता या राजकारणातून थोडासा वेळ बाजूला काढत होळीचा सण कुटुंबासोबत साजरा करण्यास राजकारणी प्राधान्य देताना दिसत आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis celebrating holi with family)यांनीही कुटुंबासोबत होळी साजरी केल्याचे दिसून येत आहे. त्यांनी आपल्या कुटुंबासोबतचा होळीचा एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

    या होळीच्या फोटोमध्ये देवेंद्र फडणवीस ,त्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा दिसत आहे. तिघांच्याही गालावर होळीचे रंग लागलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, “फॅमिलीवाली होली. हॅपी होली एव्हरीवन.”

    याआधीच्या एका ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धूलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.