माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा यांचे निधन

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचे काल रात्री निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. १४ मे १९६४ रोजी मनोहर जोशी यांचा अनघा यांच्याबरोबर विवाह झाला होता. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.