नोएडामध्ये भिंत कोसळून चौघांचा मृत्यू; आणखी काही जण अडकल्याची भीती

भिंतीलगत नाला बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत पडल्याने हा अपघात झाला. सध्या ३ जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूल करण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहेत का? याचा शोध सुरू आहे.

    नवी दिल्ली : नोएडाच्या (Noida) सेक्टर २१ मध्ये बांधकाम सुरू असलेली भिंत कोसळल्याची (Wall Collapse) दुर्घटना (Accident) घडली. या घटनेत चौघांचा मृत्यू (Death) झाला. या घटनेत भिंतीखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. जल-वायू विहारमध्ये (Jal-Vayu Vihar) पॉवर हाऊससमोर ही भिंत पडली असून, जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती डीएम सुहास एलवाय यांनी दिली.

    नाल्याच्या दुरुस्तीदरम्यान सुमारे २०० मीटर सीमाभिंत खाली पडल्याने अपघात झाला. घटनेवेळी या ठिकाणी एकूण १२ मजूर काम करत होते. स्थानिकांच्या माहितीवरून पोलीस (Delhi Police) आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. भिंतीलगत नाला बनवण्याचे काम सुरू असताना अचानक भिंत पडल्याने हा अपघात झाला. सध्या ३ जेसीबीच्या सहाय्याने मातीचा ढिगारा बाजूल करण्याचे काम सुरू असून, ढिगाऱ्याखाली कुणी अडकले आहेत का? याचा शोध सुरू आहे.

    नोएडाचे डीएम सुहास एलवाय यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, नोएडा सेक्टर २१ मधील जलवायू विहारजवळ ड्रेनेज दुरुस्तीच्या कामाचे कंत्राट दिले होते. यावेळी मजूर विटा काढत असताना भिंत कोसळून हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या जिल्हा रुग्णालयात दोन आणि कैलास रुग्णालयात दोन अशा एकूण ४ मृत्यूची नोंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले.