Mansukh-Vasava

गुजरात राज्यातील भाजपचे भरुचचे खासदार मनसुख वसावा (mp mansukh vasava) यांनी पक्षाचा राजीनामा(mansukh vasava resignation) दिला आहे.

अहमदाबाद : गुजरात राज्यातील भाजपचे भरुचचे खासदार मनसुख वसावा (mp mansukh vasava) यांनी पक्षाचा राजीनामा(mansukh vasava resignation) दिला आहे. खासदार मनसुख वसावा गेल्या काही दिवसांपासून भाजपतील नेत्यांवर नाराज होते. त्यामुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असल्याची चर्चा सुरु आहे.

खासदार मनसुख वसावा यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने हा भाजपसाठी हा मोठा धक्का आहे. मिळालेल्या माहितीनुसार मनसुख वसावा हे आदिवासी नेते आहेत. खासदार वसावा यांनी २८ डिसेंबरलाच गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांना पत्र लिहून आपण पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान, मनसुख वसावा लवकरच लोकसभा सदस्यत्त्वाचा अर्थात खासदारकीचाही राजीनामा देणार असल्याचेही समजते.

खासदार मनसुख वसावा यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, यासाठी आपण राजीनामा दिला आहे.”

ते पत्रात पुढे म्हणतात की, पक्षावर माझी निष्ठा आहे. मी प्राणाणिकपणे पक्षाचं काम केलं. सोबतच पक्ष आणि जीवनाचा सिद्धांत याचं काटेकोरपणे पालक करण्याचा प्रयत्न केला. मात्र मी एक माणूस आहे. माणसाकडून चूक होतच असते. माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे पक्षाचं नुकसान होऊ नये, म्हणून आपण राजीनामा देत आहे. लोकसभेचं कामकाज सुरू होण्याआधीच आपण खासदारकीचाही राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.