म्हसळ्याला वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपले

हवामान खात्याने कोकणात चार ते पाच दिवस दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार म्हसळा येथे दोन दिवस दमदार श्रावणसरी वादळी वाऱ्यासह कोसळत आहेत. म्हसळ्यात आज १६५ मिमी इतका पाऊस पडला असल्याची नोंद तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे. म्हसळा येथे आतापर्यंत पडलेला हा पाऊस गेल्या वर्षाच्या तुलनेने १३०५ मिमीने कमी पडला आहे. गेल्या वर्षी ४ जुलैपर्यंत म्हसळा तालुक्यात ३१३० मिमी पावसाची नोंद आहे.

म्हसळा : डोंगर कपारीत वसलेल्या म्हसळा तालुक्यात दरवर्षी सरासरी ३६०० मिमी ते ४००० मिमी इतका पाऊस पडतो. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प असुन मागील दोन महिन्यांत आतापर्यंत अवघा १८२५ मिमी इतका पाऊस पडला आहे.

हवामान खात्याने कोकणात चार ते पाच दिवस दमदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार म्हसळा येथे दोन दिवस दमदार श्रावणसरी वादळी वाऱ्यासह कोसळत आहेत. म्हसळ्यात आज १६५ मिमी इतका पाऊस पडला असल्याची नोंद तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे. म्हसळा येथे आतापर्यंत पडलेला हा पाऊस गेल्या वर्षाच्या तुलनेने १३०५ मिमीने कमी पडला आहे. गेल्या वर्षी ४ जुलैपर्यंत म्हसळा तालुक्यात ३१३० मिमी पावसाची नोंद आहे.

या वर्षी पडत असलेला पाऊस शेतीला पूरक नसून भविष्यात पिण्यासाठी पाणी अपुरे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील बहुतांशी गावांची लोकवस्ती डोंगरावर वसलेली असल्याने तेथील नळ पाणी पुरवठा योजना विंधन विहिरीवर अवलंबून आहेत. पुढील काही दिवस जर पाऊस जास्त प्रमाणात पडला तरच म्हसळा येथील गावांना उन्हाळ्याच्या अखेरीपर्यंत पाणी पुरवठा होतो अन्यथा येथील लोकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. यावर्षी श्रावणात पडत असलेला पाऊस पुढील महिना दिड महिना असाच पडत राहिला तर तालुक्यातील पाणी टंचाई कमी होण्यास मदतीचे ठरणार आहे.  म्हसळा तालुक्यात काल आणि आज कोसळलेल्या वादळी पावसाने तालुक्यातील नद्यानाले तुडुंब भरून वाहत आहेत.  वादळी पावसाने काही गावांमध्ये घरांवरील पत्रे व कौले उडाले आहेत.