मी काँग्रेसचाच भाग आहे पण ‘त्या’ टीकेमुळे दुखावलो – सचिन पायलट

मी काँग्रेसचाच एक भाग आहे . त्यामुळे हे माझे कमबॅक नाही, असे वक्तव्य सचिन पायलट यांनी केले आहे. तराजस्थान सरकारच्या कारभाराबद्दल असलेले आक्षेप, चिंता व्यक्त करणे गरजेचे होते, असे सचिन पायलट यांंनी म्हटले आहे. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ‘निकम्मा’ म्हणत माझ्यावर टीका केल्याने दुखावलो असल्याचेही पायलट यांनी स्पष्ट केले.

या टीकेबद्दल पायलट पुढे म्हणाले की, अशा पद्धतीची टीका करण्यापासून नेहमी मी स्वत:ला रोखत असतो. मी काय करतो हे लोकांना दिसत आहे. राजस्थानमध्ये मी काय काम केले आहे हे माझ्या लोकांनी, आमदारांनी पाहिलेले आहे. ते पुढे म्हणाले की, मी कोणाचा कितीही विरोध केला तही अशी भाषा वापरणार नाही. माझ्या कुटुंबाकडून मला तशी शिकवण मिळालेली नाही. मात्र कामासंबंधी एखाद्या गोष्टीवर आक्षेप असेल तर तो मी नोंदवणार, असे पायलट यांनी स्पष्ट केले. तसेच जयपूरमध्ये चर्चा करण्यासारखी स्थिती नव्हती. प्रशासन आम्हाला भीती दाखवण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे आम्हाला राज्याबाहेत जावे लागले. आम्ही रिसॉर्टमध्ये आश्रय घेतला.  आम्ही कोणाकडून सुविधा घेत नव्हतो. आमचा खर्च आम्हीच उचलला होता, असेही पायलट म्हणाले.