‘केंद्रीय गृहमंत्र्यांना काम नसेल तर आम्ही देतो, हिंमत असेल तर १०५ जणांचे राजीनामे घ्या’

“मुख्यमंत्री पदाबद्दल ठरले नव्हते हे आपल्याला दोन वर्षानंतर आठवले का? याच्यावर आधी खुलासे झाले आहेत. सत्तेच्या वाटपाचा अर्थ काय होतो हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको. सत्तेच्या वाटपामध्ये मुख्यमंत्री पदसुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या पुण्यात खोटे बोलू नका. गृहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगावे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे ते पहा. पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही तुमच्या मर्यादेत रहा आम्ही आमच्या मर्यादेत राहू,” असे संजय राऊत म्हणाले.

    महाराष्ट्रातील सत्ता गेल्यामुळे भाजपातील राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतेदेखील वैफल्यग्रस्त झाले आहेत. हिंमत असेल तर भाजपने आपल्या 105 आमदारांचे राजीनामे द्यावेत आणि निवडणूक लढवून दाखवावी असे प्रतिआव्हान शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पुण्यात शिवसेनेवर आणि महाविकास आघाडीवर टीका केली होती. शिवसेनेने हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक घ्यावी असे आव्हान दिले होते. त्यावर संजय राऊत यांनी आज आव्हान दिले.

    राऊत म्हणाले की, “२०१४ पासून महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचा पावलोपावली विश्वास घात करणारे कोण याचं उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोणी कट कारस्थाने केली याचे उत्तर त्यांनी द्यावे. पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत द्यावे. CBI, NCB आणि ED ची चिलखते घालून तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात. हे दूर करा आणि आमच्यासोबत लढा. आम्ही छातीवर वार घेणारे आहोत पाठीमागून हल्ले करत नाही. समोर लढायचे आम्हाला शिकवू नका.”

    “मुख्यमंत्री पदाबद्दल ठरले नव्हते हे आपल्याला दोन वर्षानंतर आठवले का? याच्यावर आधी खुलासे झाले आहेत. सत्तेच्या वाटपाचा अर्थ काय होतो हे आम्ही तुमच्यासारख्या लोकांना सांगायला नको. सत्तेच्या वाटपामध्ये मुख्यमंत्री पदसुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या पुण्यात खोटे बोलू नका. गृहमंत्र्यांना देशात काम नसेल तर आम्हाला सांगावे. कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा अपमान होत आहे. तुमच्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे ते पहा. पुण्यात येऊन आम्हाला ज्ञान देऊ नका. आम्ही तुमचा आदर करतो तुम्ही तुमच्या मर्यादेत रहा आम्ही आमच्या मर्यादेत राहू,” असे संजय राऊत म्हणाले.

    आमच्या सारख्या प्रखर हिंदुत्ववादी पक्षाला भाजपने २०१४ साली सत्तेबाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. २०१४ साली शिवसेनेला सत्तेपासून दूर करा, हे सांगणारे कोण होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. हिंदुत्ववादाचा पावलो पावली विश्वासघात करणारे कोण. शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी कोणी कटकारस्थानं केली, असं राऊत म्हणाले. यावर बोला. पुण्यात जमत नसेल तर दिल्लीत बोला, असं आवाहन राऊत यांनी अमित शाहांना केलं आहे.