कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेत स्‍वातंत्र्य दिन कार्यक्रम संपन्न

कल्‍याण : कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात आज भारतीय स्‍वातंत्र्य दिन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून महापौर विनिता राणे यांच्या हस्‍ते आणि आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी परिवहन सभापती मनोज चौधरी,पालिका सदस्य राजेंद्र देवळेकर, अरुण गिध, सुधीर बासरे तसेच महापालिका अधीकारी वर्ग  उपस्थित होता.

 कोविड-१९ च्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेस मोलाचे सहकार्य करणारे आय एम ए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रदीपकुमार सांगळे, सेक्रेटरी डॉ. प्रशांत पाटील, आय एम ए डोंबिवली च्या अध्यक्षा डॉ. वंदना धाकतोडे, सेक्रेटरी डॉ. हेमंत पाटील,डॉ.मंगेश पाटे, डॉ. अर्चना पाटे, केम्पाचे अध्यक्ष डॉ. देवेंद्र मिश्रा, होमिओपॅथिक असो.चे डॉ.जयेश राठोड,निमाच्या अध्यक्षा गायत्री कुलाली, सेक्रेटरी डॉ.  माधुरी बहिरट, धारपाचे अध्यक्ष डॉ. भावना  ठक्कर, सेक्रेटरी डॉ. पंकजा महाजन,  एम सी एच आय चे श्रीकांत शितोळे, राजन बांदोडकर इ. विशेष निमंत्रित देखील भर पावसात ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते.

महापालिकेने आवर्जून  ध्वजारोहण कार्यक्रमास आमंत्रित केल्यामुळे महापौर विनिता राणे यांच्या दालनात  चहापानाचे वेळी  मान्यवरांनी भावनेने ओथंबलेल्या शब्दात महापालिकेचे आभार मानले. डोंबिवली विभागीय कार्यालय येथे स्‍थायी समिती सभापती विकास म्‍हात्रे यांच्या हस्‍ते आणि अतिरिक्‍त आयुक्‍त सुनिल पवार यांच्या  उपस्थितीत ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.  डोंबिवली येथील वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्‍हात्रे क्रिडा संकुलातील कॅ. विनयकुमार सचान स्‍मारकास महापौर विनिता राणे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्‍ते  पुष्‍पचक्र अर्पण करण्‍यात आले. तद्नंतर क्रीडा संकुलाचे आवारात महापौर व आयुक्त यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.