किरीट सोमय्यांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर – ‘लाभार्थ्यांना उत्तर तर द्यावं लागणार ना?’

शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत(ed notice to varsha raut) यांना ईडीने नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असं म्हणत एका प्रकारे ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत(ed notice to varsha raut) यांना ईडीने नोटीस पाठवून २९ डिसेंबरला चौकशीसाठी बोलावलं आहे. पीएमसी गैरव्यवहार प्रकरणी(pmc bank scam) ही नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करत कोणामध्ये किती जोर आहे पाहूया असं म्हणत एका प्रकारे ईडीच्या कारवाईला आव्हान दिलं होतं. दरम्यान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.


किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “वयोवृद्ध गुंतवणूकदार ते पीएमसी बँक, पीएमसी बँक ते एचडीआयएल (वाधवान बंधू), एचडीआयएल ते प्रवीण राऊत, प्रवीण राऊत ते माधूरी प्रवीण राऊत, माधूरी प्रवीण राऊत ते वर्षा / संजय राऊत…गेल्या काही महिन्यात ईडीकडून तीन नोटीस…पण उत्तर नाही…का? लाभार्थ्यांना उत्तर द्यावेच लागेल”.

सूत्रांच्या माहितीनुसार, प्रवीण राऊत यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली होती. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाले. त्याबाबतची माहिती जाणून घेण्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस पाठवली आहे.