नितेश राणे आणि नवाब मलिकांची एकमेकांवर फोटो मॉर्फ करुन टीका, दोन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची राजकीय संस्कृती समजून घेण्याची गरज

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती. त्यावेळी विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. नेमक्या त्याचवेळी आदित्य ठाकरे हे सभागृहात जाण्यासाठी त्याठिकाणी आले. आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या पायऱ्या चढत असताना नितेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवण्यासाठी 'म्याव-म्याव' आवाज काढला. या प्रकारामुळे शिवसेनेचे आमदार संतापले होते. मात्र, त्यानंतही नितेश राणे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते. शिवसेना ही पूर्वी वाघ होती, आता तिची मांजर झाली आहे. त्यामुळे मी केले त्यामध्ये काहीही गैर नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

    भाजप आमदार नितेश राणे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून म्यॅव म्यॅव अशी घोषणा केली होती. त्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पैहचान कौन म्हणत एक मांजर आणि कोंबडी असा कॉकटेल फोटो शेअर राणेंवर टीका केली होती. आता त्यालाच निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

    नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्याकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर आहे. नितेश राणे यांच्याकडून देखील नवाब मलिक यांच्या प्रमाणं एक फोटो ट्विट करत त्याला कॅप्शन दिलं आहे. “ही प्रजाती फक्त भंगारात आढळते, ओळखा पाहू कोण?” अशा ओळी नितेश राणे यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत लिहिल्या आहेत.

    हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती. त्यावेळी विरोधक विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. नेमक्या त्याचवेळी आदित्य ठाकरे हे सभागृहात जाण्यासाठी त्याठिकाणी आले. आदित्य ठाकरे विधिमंडळाच्या पायऱ्या चढत असताना नितेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवण्यासाठी ‘म्याव-म्याव’ आवाज काढला. या प्रकारामुळे शिवसेनेचे आमदार संतापले होते. मात्र, त्यानंतही नितेश राणे यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले होते. शिवसेना ही पूर्वी वाघ होती, आता तिची मांजर झाली आहे. त्यामुळे मी केले त्यामध्ये काहीही गैर नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले.

    इथूनच वादाला सुरुवात झाली. नवाब मलिकांना वादात उडी घेत आदित्य ठाकरेंवरील घोषणेला नवाब मलिकांनी उत्तर दिले. त्यांनी एक कोंबडी आणि मांजर, असा कॉकटेल फोटो शेअर करत पहेचान कौन? असं लिहून नितेश राणेंवर पलटवार केला. त्यानंतर आता नितेश राणेंनी मलिकांना प्रत्युत्तर दिले आहे.