maniram das

अयोध्येतील( Death Of Sadhu In Ayodhya) एका मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने साधुचं निधन झालं आहे.

    लखनऊ : उत्तर प्रदेशात(Uttar Pradesh) अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर अयोध्येत आणखी एका साधूचा संशयास्पद मृत्यू(Death Of Sadhu In Ayodhya) झाला आहे. अयोध्येतील(Ayodhya) एका मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने साधुचं निधन झालं आहे. मणिराम दास(Death Of Maniram Das After Falling From Temple Roof) असं या साधूचं नाव आहे. पोलिसांनी दास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनानंतरच मणिराम दास यांच्या मृत्यूचे खरे कारण समोर येईल. पोलीस या प्रकरणाचा सध्या तपास करत आहेत.

    पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात मृत साधू हे गेल्या अनेक दिवसांपासून नैराश्यात असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र त्यांच्या नैराश्याचे कारण अद्याप समजलेेले नाही. पोलीस सध्या मंदिर प्रशासन आणि इतर साधूंकडून माहिती घेत आहेत. याशिवाय पोलीस दास यांचे फोन रेकॉर्डही चेक करत आहेत.

    दरम्यान, या घटनेमुळे अयोध्येतील साधू, महंतांमध्ये शोकाकूळ वातावरण आहे. मणिराम गेल्या काही दिवसांपासून खूप कमी बोलत होते.ते एकटे राहत होते.

    याआधी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे महंत गिरी यांच्या आत्महत्येची घटना समोर आली होती. त्यांच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाईड नोट मिळाली होती. त्यामध्ये त्यांनी आपले शिष्य आनंद गिरी, आध्या तिवारी आणि संदीर तिवारी यांच्यावर मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी तीनही जणांना अटक केली आहे.