यंदा राज्यात उन्हाळा असणार भयंकर -शास्त्रज्ञांनी दिला गंभीर इशारा

भारतीय उपखंडामध्ये प्रत्येक वर्षी तापमानवाढीमुळे संकटे वाढत आहेत. अशात मोठ्या संकटांपासून वाचायचे असल्यास तापमानात होणारी वाढ रोखणे गरजेचे आहे. तापमान नियंत्रित केले जाणार नाही तोपर्यंत अशी अनेक संकटे समोर येत राहातील.

    मुंबईः राज्यभरात उकाडा वाढत चालला असून यंदाचा उन्हाळा हा भयंकर(dangerous summer) राहणार असल्याचा गंभीर इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे यंदाचा उष्णताही जीवघेणा ठरू शकते. विविध संस्थांमधील शास्त्रज्ञांनी संशोधनात केलेल्या दाव्यानुसार महाराष्ट्रासह देशभरातील अन्नधान्याचे मोठे उत्पादक असलेल्या भागांवरही याचा परिणाम होईल. कडक उन्हामुळे काम करण्यात अडचणी येऊन भर उन्हात काम करणेही असुरक्षित ठरेल.

    तापमानवाढ रोखणे गरजेचे
    तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतीय उपखंडामध्ये प्रत्येक वर्षी तापमानवाढीमुळे संकटे वाढत आहेत. अशात मोठ्या संकटांपासून वाचायचे असल्यास तापमानात होणारी वाढ रोखणे गरजेचे आहे. तापमान नियंत्रित केले जाणार नाही तोपर्यंत अशी अनेक संकटे समोर येत राहातील. सध्याची परिस्थिती पाहाता या देशांना यासाठी आतापासून काम करणे गरजेचे आहे. आताच तापमान पाहाता काही ठिकाणी तापमानात १.५ अंश सेल्सिअस वाढ झाल्यासही हे अत्यंत गंभीर ठरू शकतं. सध्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वेगाने कमी करण्याची गरज आहे. जागतिक तापमानात १.५ ते २ अंश सेल्सिअस तापमान वाढल्यामुळे दक्षिण आशियात प्राणघातक उष्णता राहिल.

    उष्णतेचे चटके लागायला सुरुवात
    राज्यभरात मार्च महिन्यातच दाखल झालेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना चटके लागण्याला सुरुवात झाली असून एप्रिल आणि मे महिन्यात यात आणखी वाढ नोंदविण्यात येईल, अशी शक्यता देखील हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे व पालघर या शहरांसह राज्यातील अन्य शहरांच्या कमाल तापमानाचा पारा ३८ अंशावर गेला असून, पुढील पाच दिवस संपूर्ण कोकणासह राज्यभरात बहुतांशी जिल्ह्यात कमाल तापमान चढेच राहील. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत ६ अंशांची वाढ नोंदविण्यात येत असून पालघर आणि रत्नागिरीसह कोकणात कमाल तापमान ४० अंशांवर पोहोचले असून, दिवस संपूर्ण राज्यभरात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. धुळे, नंदूरबार, जळगाव आणि नाशिक येथील हवामान पुढील पाच दिवस उष्ण नोंदविण्यात येईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.