Rapist will get severe punishment in Pakistan, rapist will be made

मध्य प्रदेशच्या भोपाळमधील गोविंदपुरा भागात सावत्र मुलानेच आईवर बलात्कार केल्याची घटना घडली.(stepson raped mother)या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

आजकाल अशा अनेक घटना बघायला मिळत आहेत ज्यावरून नात्यांची किंंमतच संपली आहे का ? असा प्रश्न निर्माण होईल. मध्य प्रदेशच्या भोपाळमधील गोविंदपुरा भागात सावत्र मुलानेच आईवर बलात्कार केल्याची घटना घडली.(stepson raped mother)या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. पीडित महिला शुक्रवारी रात्री तिच्या रुममध्ये झोपलेली असताना आरोपी रात्री तिथे आला व त्याने बलात्कार केला. याबद्दल कुठे वाच्यता केली, तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असे त्याने आपल्या सावत्र आईला सांगितले.

पीडित महिलेने मदतीसाठी आरडा-ओरडा केला. तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिचं तोंड बंद केलं. घटनेच्यावेळी तिची दोन मुले शेजारच्या खोलीत झोपली होती. बलात्कारानंतर आरोपीने पीडित महिलेला ठार मारण्याची धमकी दिली. नंतर तो तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी महिलेने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. नातेवाईकांनी बदनामी होईल म्हणून पोलिसांकडे तक्रार करु नको, असे सांगितले.अखेर शनिवारी तिने गोविंदपुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.