Tejaswi Yadav's statement has caused a stir in Bihar Election winds to blow again in Bihar

बिहारमध्ये नितीश कुमार(nitish kumar) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन महिनाच झाला आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव(tejaswi yadav) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे.

बिहारमध्ये नितीश कुमार(nitish kumar) यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होऊन महिनाच झाला आहे. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव(tejaswi yadav) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. तेजस्वी यादव यांनी बिहार विधानसभा निवडणूक निकालाची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी बिहारमध्ये पुढच्या वर्षीही निवडणुका होऊ शकतात, असे म्हटले आहे. त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहा असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे.

तेजस्वी यादव पुढे म्हणाले की, माझी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी मला पूर्ण अधिकार दिले आहेत. तुम्हीही हे विसरून चालणार नाही आणि सक्रिय राहा. सगळ्यांनी पूर्ण तयारीनिशी राहावं, पुढील वर्षी पुन्हा निवडणूक होऊ शकते. सध्याच्या सरकारवर लोक नाराज आहेत.

यावेळी तेजस्वी यादव यांनी पक्षात फेरबदल करण्याचेही संकेत दिले. पक्ष सर्वच समूहातील लोकांना संधी देईल. जुन्या परंपरेत आता बदल करण्याची गरज आहे. आढावा घेऊन हे बदल केले जातील, असेही ते म्हणाले.