आसाममध्ये अडकलेले महाराष्ट्राचे तरुण सुखरुप परतले, अजित पवारांकडे मागितली होती तरुणांनी मदत

‘आसाम रायफल्स’ची भरती प्रक्रिया ७ व ८ जानेवारी दरम्यान आसाममधील करबी अँगलॉंग या जिल्ह्यातील दिपू येथे होणार होती. त्यासाठी राज्यातून पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे अशा विविध जिल्ह्यांतून सुमारे अडीचशेहून अधिक तरुण गेल्या ३ जानेवारीला आसाममध्ये पोचले होते. मात्र, तेथे भरतीपूर्वीच त्यांना कोरोनाचा सामना करावा लागला. तरुण कोरोनाबाधित झाल्याने त्यांना दिपू वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले. तेथे त्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न, पाणी दिल्याने त्यांच्या तब्येती खालविल्या होत्या.

    पुणे : आसाममध्ये सैन्य भरतीसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील तरुणांना गैरसोयींचा सामना करावा लागला. महाराष्ट्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर आसाम सरकारकडून त्यांना विविध सुविधा पुरविण्यात आल्या. कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. दरम्यान, बुधवारी आसाममधून निघालेले हे तरुण शुक्रवारी सकाळी महाराष्ट्रात सुखरूप पोचले आहेत.

    हे तरुण आसामच्या रुग्णालयात क्वारंटाईन सेंटरमध्ये असताना त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मदत मागितीली. महत्वाची बाब म्हणजे ‘आम्ही कोरोना पॉझिटिव्ह नसतानाही आम्हाला क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याचा आरोप या मुलांनी केला. तसंच या ठिकाणी चांगलं जेवण, पाणी उपलब्ध होत नसल्याचं या मुलांचं म्हणणं आहे.

    ‘आसाम रायफल्स’ची भरती प्रक्रिया ७ व ८ जानेवारी दरम्यान आसाममधील करबी अँगलॉंग या जिल्ह्यातील दिपू येथे होणार होती. त्यासाठी राज्यातून पुणे, नगर, सांगली, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, धुळे अशा विविध जिल्ह्यांतून सुमारे अडीचशेहून अधिक तरुण गेल्या ३ जानेवारीला आसाममध्ये पोचले होते.

    मात्र, तेथे भरतीपूर्वीच त्यांना कोरोनाचा सामना करावा लागला. तरुण कोरोनाबाधित झाल्याने त्यांना दिपू वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आले. तेथे त्यांना निकृष्ट दर्जाचे अन्न, पाणी दिल्याने त्यांच्या तब्येती खालविल्या होत्या. यासंदर्भात ‘सकाळ’ने ‘मराठी तरुणांची आसाममध्ये हेळसांड’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली.