‘आमदार विकत घेतल्याने काही होणार नाही, आधी ३० जागा जिंकून दाखवा’ – ममता बॅनर्जींचे भाजपला आव्हान

आगामी विधानसभा निवडणुकीमुळे पश्चिम बंगालमध्ये(west bengal election) राजकीय वातावरण तापले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(mamata banerjee challenge to bjp) यांनी आज बीरभूम जिल्ह्यात पदयात्रा काढली होती. यानंतर एका सभेत बोलताना त्यांनी भाजपाने पश्चिम बंगालमध्ये ३० जागा जिंकून दाखवाव्यात, असं आव्हान दिलं आहे.

भाजपाने २९४ जागांचं स्वप्न नंतर पाहावं, आधी ३० जागा जिंकून दाखव्यावत, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. भाजपा नेते दर आठवड्याला येतात पंचातारांकित हॉटेलमध्ये जेवण करतात. मात्र आदिवासीच्या घरी जेवण करत असल्याचं दाखवतात, असेही त्या म्हणाल्या.

आमदारांना विकत घ्याल, पक्षाला नाही

काही आमदारांनी पक्ष सोडला म्हणून काही फरक पडत नाही, जनता आमच्याबरोबर आहे. तुम्ही(भाजपा) काही आमदारांना विकत घेऊ शकतात, मात्र तृणमूल काँग्रेसला नाही विकत घेऊ शकत. असं सांगून ममता बॅनर्जींनी भाजपा केंद्रीय संस्था व पैशांच्या बळावर बंगालमध्ये घुसू इच्छित आहे, मात्र त्यांना यामध्ये यश येणार नसल्याचं सांगितलं.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, आम्ही वर्षाचे ३६५ दिवस गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या सोबत आहोत. मात्र भाजपा रोज खोटे व्हिडिओ पसरवून समाजात तेढ निर्माण करत आहे. जी लोकं महात्मा गांधी आणि देशाच्या अन्य महापुरुषांचा सन्मान करत नाहीत. ते ‘सोनार बांगला’ बनवण्याच्या गप्पा मारत आहेत.