husen dalwai and sanjay raut

हुसेन दलवाई(husain dalwai criticized sanjay raut) म्हणाले की, संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येतात. आत्ता त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही.

    शिवसेना खासदार संजय राऊत(sanjay raut) यांनी पुन्हा एकदा शरद पवार (sharad pawar)यांनी युपीएचं अध्यक्षपद (UPA president)भूषवायला हवं या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे. मात्र काँग्रेस यावर नाराज झाली आहे. काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

    हुसेन दलवाई म्हणाले की, संजय राऊत हे शरद पवारांचे खास शिष्य आहेत. त्यामुळे ते शिवसेनेत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत असा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा ते अशी आवई उठवतात आणि नंतर गोत्यात येतात. आत्ता त्यांना हे बोलण्याचा अधिकार नाही. राज्यातल्या सरकारमुळे काँग्रेस नसून काँग्रेसमुळे हे सरकार अस्तित्वात आलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेचा वाद निर्माण करताना त्याचं भान त्यांनी ठेवणं आवश्यक आहे. संजय राऊतांच्या या वक्तव्याला फार महत्त्व देण्याची गरज नाही .

    हुसेन दलवाई  म्हणाले की, संजय राऊतांचं हे विधान हास्यास्पद आहे. अशी विधानं करण्याची त्यांना सवय झाली आहे. काहीही बोलतात आणि बऱ्याच वेळा गोत्यात येतात. शिवसेना अजूनही युपीएमध्ये नाही. असं असताना युपीएचं प्रमुख कोण होणार, हे तुम्हाला सांगण्याचा अधिकार दिला कुणी? ही अशी बावळट चर्चा करण्याची काय गरज आहे? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

    ते पुढे म्हणाले की, स्वत: शरद पवारही असं म्हणणार नाही. काँग्रेस पक्ष हा प्रबळ पक्ष आहे. असं असताना त्याचं नेतृत्व इतर पक्षाचं कुणी कसं करणार? एनसीपी ही काही ऑल इंडिया पार्टी नाही. एनसीपी राज्यातल्या विशिष्ट गटापुरता आणि विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित पक्ष आहे. सध्या काँग्रेसपेक्षा जरा जास्त जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, म्हणून युपीएचं अध्यक्षपद त्यांना मिळेल असं समजणं चुकीचं आहे.