182 वेळा जगातील 34 देशांमध्ये इंटरनेट बंदी; इंटरनेट शटडाऊनमध्ये भारत सर्वात टॉपवर

इंटरनेट ही सध्याच्या काळाची गरज आहे. लॉकडाऊनमध्ये तर इंटरनेट हा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सर्वात जास्त वेळेस इंटरनेट ब्लॉक किंवा बंद करणाऱ्या देशांच्या यादीत भारत सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात भारतामध्ये तब्बल 106 वेळेस इंटरनेट शटडाऊन करण्यात आले आहे. अॅक्सेस नाऊ या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे(182 times Internet bans in 34 countries around the world India tops in internet shutdown).

    दिल्ली : इंटरनेट ही सध्याच्या काळाची गरज आहे. लॉकडाऊनमध्ये तर इंटरनेट हा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. सर्वात जास्त वेळेस इंटरनेट ब्लॉक किंवा बंद करणाऱ्या देशांच्या यादीत भारत सलग चौथ्या वर्षी पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षभरात भारतामध्ये तब्बल 106 वेळेस इंटरनेट शटडाऊन करण्यात आले आहे. अॅक्सेस नाऊ या संस्थेने जारी केलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे(182 times Internet bans in 34 countries around the world India tops in internet shutdown).

    गेल्या वर्षभरात भारतात 106 वेळेस शटडाउन झाले आणि त्यापैकी 85 वेळेस तर फक्त जम्मू-काश्मीरमध्येच इंटरनेट बंद करण्यात आले होते. जम्मू-काश्मीरमध्ये अधिकारी इंटरनेट व्यत्यय लादणे सुरू ठेवतात जो दीर्घकाळ कायम असतो, असे या अहवालात नमूद केले आहे. दहशतवादी कारवायांची चाहुल लागल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इंटरनेट बंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    या वर्षाच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या ‘टॉप10व्हीपीएन’ या रिसर्च ग्रुपच्या अहवालानुसार, भारतातील केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांच्या आदेशावरून झालेले इंटरनेट शटडाउन एकूण 1,157 तास चालले होते. परिणामी 58.3 कोटी डॉलर्सचा फटका बसला. तर, या इंटरनेट बंदीचा 59 कोटी नागरिकांवर परिणाम झाला.