BSNL चे 2 नवे प्लॅन, 58 रुपयात रोज मिळणार 2GB डेटा

BSNLने नवीन प्लॅन आणले आहेत. ५८ आणि ५९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळत आहेत. ५८ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळेल आणि त्याची वॅलिडिटी १ आठवड्यासाठी उपलब्ध असणार आहे. तर 59 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1 जीबी डेटासाठी अमर्यादित कॉलिंग देखील मिळेल.

  BSNL यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. BSNLयूजर्सना आता कंपनीकडून एक नवीन भेट देण्यात येत आहे. BSNL ने पुन्हा एकदा आपल्या यूजर्सना लक्षात घेऊन काही नवीन प्लॅन बाजारात आणले आहेत. दोन्ही प्लॅनमध्ये उपलब्ध असलेले बेनिफिट्स देखील भिन्न आहेत आणि हे डेटापासून ते कॉलिंग फीचर्ससह एकत्र येतात. आज आम्ही तुम्हाला फक्त या प्लॅन्सची माहिती देणार नाही, तर तुम्ही ते कसे रिचार्ज करू शकता ते देखील सांगू.

  BSNL 58 रिचार्ज प्लॅन-
  जर तुम्ही हा प्लान विकत घेतला तर तुम्हाला दररोज 2 जीबी डेटा यात मिळणार आहे. या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनचे ​​निबेफिट्स एका आठवड्यासाठी आहेत. एकदा डेटा संपला की त्याचा वेग कमी होईल, पण तुम्हाला 2 GB सुपरफास्ट इंटरनेट यात मिळणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी, तुमच्याकडे सक्रिय योजना असणे आवश्यक आहे. हे पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळणे सुरू होईल.

  BSNL 59 रिचार्ज प्लॅन-
  BSNL चा हा प्लॅन खूप ट्रेंडमध्ये आहे आणि कंपनीने हा प्लॅन विशेषतः नुकताच लाँच केला आहे. यामध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर त्याची वैलिडिटी एका आठवड्याची आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंग चे फायदे देखील उपलब्ध आहेत. यासोबतच तुम्हाला दररोज १ जीबी डेटा दिला जातो. मात्र लक्षात ठेवा तुम्ही हा प्लान विकत घेतला तरी तुम्हाला फक्त एका आठवड्याची वैलिडिटी मिळते. तुम्ही जर BSNL चे यूजर्स असाल तर हा प्लॅनदेखील तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  BSNL काय आहे?
  भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) हा भारत सरकारचा अधिकृत उद्योग आहे. पूर्वीचे दूरसंचार व डाक तार खाते यांच्या एकत्रीकरणातून दूरसंचार विभाग (Department of Telecommunications) हा स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. या दूरसंचार विभागाचे १ आक्टोबंर, २००० रोजी भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीत रूपांतर झाले. कनेकटिंग इंडिया हे बीएसएनएल चे ब्रीदवाक्य आहे. बीएसएनएल चे मुख्यालय दिल्ली येथे आहेया कंपनीचे सर्व मालकी हक्क हे भारत सरकार कडे आहेत.