5G इंटरनेटमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला होणार ‘इतका’ फायदा

    येणारा ऑक्टोबर महिना हा सर्व भारतीय इंटरनेट यूजर्ससाठी अत्यंत खास ठरणार आहे. 4 G नंतर ज्या 5 G इंटरनेटची सर्वांचं प्रतीक्षा होती अशी सुस्साट 5 जी इंटरनेट सुविधा भारतात १ ऑक्टोबर २०२२ पासून सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते १ ऑक्टोबर रोजी  ५ जी इंटरनेट सेवेचा शुभारंभ होणार असून याचा भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. तसेच 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०२३ ते २०४० दरम्यान ३६. ४ ट्रिलियन रुपये (सुमारे ४५५ अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे.

    देशभरात १२ ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु :

    ऑगस्ट महिन्यात 5 जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात १२ ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा उपलब्ध असणार आहे.
    सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात आज ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ‘भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ होईल. ‘इंडिया मोबाइल काँग्रेस’ या आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनात या योजनेचा शुभारंभ होणार आहे.’