ai youtube feature

YouTube ने आपल्या युजर्ससाठी जाहीर केलंय की कंपनी AI ऑटोजनरेट केलेल्या सारांश वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या आवडीचा कंटेंट शोधण्यात पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत.

  सध्या AI (Artificial Intelligence) ची सगळीकडे चर्चा सुरु आहे. नुकत्याच AI च्या विशेष बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्दयांवर चर्चा करण्यात आली. लवकरच यामध्ये नवीन अपडेट येणार आहे. टेक कंपनी गुगल आपल्या विविध प्लॅटफॉर्म व सेवांमध्ये AI चा समावेश करणार आहे. युट्यूबर असलेल्यांना Subscriber वाढवण्यासाठी कटेंट शोधण्यासाठी AI आता मदत करणार आहे. यासाठी यूट्यूबर युजर्ससाठी एक नवीन AI टूल आणले जात आहे.

  YouTube ने आपल्या युजर्ससाठी जाहीर केलंय की कंपनी AI ऑटोजनरेट केलेल्या सारांश वैशिष्ट्याची चाचणी करत आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सना त्यांच्या आवडीचा कंटेंट शोधण्यात पूर्वीपेक्षा अधिक सुविधा मिळणार आहेत.

  कसं काम करेल YouTube चं AI टूल ?
  YouTube च्या AI ऑटोजनरेटेडच्या मदतीने, प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक व्हिडिओसह सारांश पाहता येईल. व्हिडिओशी संबंधित माहिती या सारांशात दिसेल. यूट्यूबवर सर्च करून व्हिडिओ पाहणाऱ्या युजर्ससाठी हे फीचर  उपयुक्त ठरणार आहे. या फीचरच्या मदतीने युजरला कोणत्याही व्हिडिओचा पटकन आढावा घेता येणार आहे. या फीचरमुळे युजर्सना व्हिडिओ नेमका कशाचा आहे आणि त्या व्हिडिओ पाहायचा आहे की नाही हे ठरवता येईल.

  कसं असेल व्हिडिओचं वर्णन ?
  यूट्यूबवर व्हिडिओसह वर्णनाची सुविधादेखील उपलब्ध आहे. YouTube व्हिडिओंवरील वर्णन चॅनेल आणि व्हिडिओ निर्मात्याने स्वतः लिहिले आहे. वर्णन वाचल्यानंतरही, YouTube वर व्हिडिओ पाहणारे युजर्स ठरवतील तो व्हिडिओ त्याच्या आवडीचा आहे की नाही. अशा वेळी, यूट्यूबरच्या नवीन एआय ऑटोजनरेटर सारांश वैशिष्ट्यासह वर्णन वैशिष्ट्य हटविले जाणार नाही. जर तुम्ही YouTube चे नवीन फीचर वॉच आणि सर्च पेजवर पाहू शकाल. सुरुवातीच्या टप्प्यात यूट्यूबचे नवीन फीचर टेस्टिंग बेसवर फक्त काही युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.