Apple आता Vision Pro आणण्याच्या तयारीत; Vision Pro लाँच होणार तरी कधी? काय असेल त्याची किंमत?; जाणून घ्या…

जगभरात प्रसिद्ध असलेली ऍप्पल (Apple) कंपनी आता आपले नवे उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत आहे. व्हिजन प्रो (Vision Pro) असे या उत्पादनाचे नाव आहे. या व्हिजन प्रोच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही खोलीला तुमच्या पर्सनल थिएटरमध्ये बदलता येणार आहे.

  नवी दिल्ली : जगभरात प्रसिद्ध असलेली ऍप्पल (Apple) कंपनी आता आपले नवे उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत आहे. व्हिजन प्रो (Vision Pro) असे या उत्पादनाचे नाव आहे. या व्हिजन प्रोच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही खोलीला तुमच्या पर्सनल थिएटरमध्ये बदलता येणार आहे. याला 4K टीव्हीपेक्षा चांगली पिक्सेल क्लालिटी असणार आहे. यामध्ये विविध प्रकारचे कंटेंटही अनुभवता येणार आहे.

  Apple ने नुकत्याच झालेल्या WWDC 2023 वेळी Apple व्हिजन प्रोचे अनावरण केले. या व्हिजन प्रोच्या माध्यमातून युजर्सना अमर्यादित कॅनव्हासवर अॅप्स, मोबाइल आणि मॅक फिचर्सवर काम करता येणार आहे. यात इतर अनेक फिचर्सचा समावेश आहे. ऍप्पलच्या या व्हिजन प्रोची किंमत $3,499 म्हणजे अंदाजे 2,88,172 रुपये असणार आहे.

  व्हिजन प्रो म्हणजे नेमकं आहे तरी काय?

  व्हिजन प्रो हे ऍप्पलचं असं उत्पादन आहे ते कोणत्याही खोलीला तुमच्या वैयक्तिक थिएटरमध्ये बदलू शकते. याला 4K टीव्हीपेक्षा चांगली पिक्सेल स्पष्टता मिळते. यामध्ये तुम्हाला भरपूर कंटेंट अनुभवता येईल. हे सर्व तुम्हाला तुमच्या घरी राहून करता येणार आहे.

  …म्हणून किंमत जाहीर करण्यास उशीर

  व्हिजन प्रो किंमतीची घोषणा करण्यास कंपनीकडून उशीर केला जात होता. कारण 2.88 लाखांमध्ये मिळणारं हे उत्पादन सामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर असल्याचे दिसत आहे. असे असले तरी येत्या 2025 पर्यंत हे उत्पादन लाँच करण्याच्या तयारीत कंपनी असल्याची माहिती दिली जात आहे.