Apple ने लाँच केले iOS 17.5 अपडेट, युजर्सना कोणते नवीन फीचर्स मिळणार, सविस्तर वाचा

Apple कंपनीने iPhone यूजर्ससाठी iOS 17.5 अपडेट चालू केले आहे. या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत, जे यूजर्ससाठी खूप फायद्याचे ठरू शकतात. (फोटो सौजन्य: istock)

  Apple कंपनीने या आठवड्यात आयफोन युजर्ससाठी लेटेस्ट iOS 17.5 अपडेट चालू केले आहेत. विशेष म्हणजे या अपडेटमधील काही खास वैशिष्ट्ये फक्त युरोपियन युनियन (EU) देशांसाठी असतील. काही आठवड्यांपासून टेस्टरर्स या अपडेटसाठी ट्राय करत होते, मात्र आता हे नवीन अपडेट्स अधिकृतपणे प्रत्येकासाठी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सर्व एलिजिबल आयफोन यूजर्स हे अपडेट्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल करू शकतात आणि नवीन फीचर्स वापरू शकतात. या अपडेटमध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत, जे यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरू शकतात. आम्ही तुम्हाला या फीचर्सची माहिती विस्तारपूर्वक सांगणार आहोत.

  iOS 17.5 अपडेटमध्ये iPhone वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत

  1. वेबसाइटवरून ॲप डाउनलोड करा (केवळ EU)
  युरोपियन युनियन यूजर्स आता ॲप स्टोअर व्यतिरिक्त इतर वेबसाइटवरूनही ॲप्स डाउनलोड करण्यास सक्षम असतील. मात्र, ॲपल डेव्हलपर्ससाठी हे सोपे असणार नाही. ॲप डाउनलोड करण्यासाठी, डेवलपर्सना ॲपलच्या नियमांचे पालन करावे लागेल.

  2. रिपेयर स्टेट मोड
  आतापर्यंत आयफोन दुरुस्तीसाठी देताना त्याचा Find My ऑप्शन बंद करावा लागत होता. पण आता नवीन रिपेअर स्टेट मोडसह तुम्ही तुमचा फोन सहज ट्रॅक करू शकता. तुमचा ऍपल आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर, हा मोड सक्रिय होईल आणि तुमचा फोन कुठे आहे हे तुम्हाला सहजपणे कळू शकेल.

  3. Apple News+ ऑफलाइन मोड
  आता तुम्ही Apple News+ च्या पेड सबस्क्रिप्शन चा वापर करून कंटेंट ऑफलाइनदेखील वाचू शकता. याव्यतिरिक्त, यात Wordle सारख्या डेली वर्ड गेम्सचा ही समावेश आहे, ज्याला Quartiles म्हणतात.

  4. इतर ब्लूटूथ ट्रॅकर्सचा अलर्ट
  हा अपडेट Apple आणि Google द्वारे केलेला एक प्रयत्न आहे, ज्यात हे लोकांना दुसऱ्या डिव्हाइद्वारे ट्रैक होण्यापासून वाचवले जाईल. या वैशिष्ट्याच्या मदतीने, आयफोन यूजर्सना आता जवळपासच्या कोणत्याही अज्ञात ट्रॅकिंग डिव्हाइसचे अलर्ट मिळत राहतील.

  5. तुमचा आयफोन कसा अपडेट करायचा?
  आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमचा iPhone iOS 17.5 वर कसा अपडेट करू शकता.

  • सर्व प्रथम तुमच्या iPhone च्या सेटिंग्ज वर जा.
  • यानंतर सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करा.
   त्यानंतर स्क्रीनवर नवीन अपडेट दिसेल.
  • यानंतर, तुमचा 6-अंकी पासवर्ड प्रविष्ट करा आणि स्थापित करण्याची परवानगी द्या.
  • यानंतर तुमचा iPhone iOS 17.5 वर अपडेट होईल आणि रीस्टार्ट होईल.