Hanuman AI स्वदेशी चॅटबॉट लाँच, हिंदीसह 11 भारतीय भाषांना करणार सपोर्ट!

हनुमान एआय चॅटबॉट ज्यांना इंग्रजी वापरण्यास अडचण येते त्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा AI चॅटबॉट हिंदीसह 11 प्रादेशिक भाषांना सपोर्ट करेल. ज्यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे.

  12 भाषांना सपोर्ट करणारा भारतातील पहिला स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट लॉन्च करण्यात आला आहे. हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट 98 जागतिक भाषांनाही सपोर्ट करेल. हनुमान एआय चॅटबॉट सात IIT, रिलायन्स, SML इंडिया आणि अबू धाबीच्या 3AI होल्डिंग यांनी संयुक्तपणे विकसित केले आहे.
  हनुमान एआय चॅटबॉट इंग्रजी न जाणणाऱ्या वापरकर्त्यांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत हा AI चॅटबॉट हिंदीसह 11 प्रादेशिक भाषांना सपोर्ट करेल. ज्यामध्ये मराठी, गुजराती, बंगाली, कन्नड, ओडिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि सिंधी यांचा समावेश आहे.

  चॅटबॉट पूर्णपणे मोफत उपलब्ध

  अँड्रॉईड युजर्स गुगल प्ले स्टोअरवरून हनुमान एआय चॅटबॉट डाउनलोड करू शकतात. हा चॅटबॉट पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे. तसेच, हा चॅटबॉट लवकरच iOS वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरवर उपलब्ध होईल.
  हनुमान चॅटबॉट LLM पद्धतीवर काम करेल, ज्याला स्पीच टू टेक्स्ट यूजर फ्रेंडली सेवा म्हणतात. हे AI मॉडेल मोठ्या प्रमाणात डेटा शिकून नैसर्गिक आवाज प्रतिसाद निर्माण करते. Open AI आणि Google Gemini AI शी स्पर्धा करण्यासाठी रिलायन्सच्या बाजूने ही चांगली सुरुवात आहे.
  हनुमान चॅटबॉट आणि भारतजीपीटी व्यतिरिक्त, इतर अनेक एआय मॉडेल्स देखील देशात विकसनशील टप्प्यात आहेत. ज्यामध्ये सर्वम आणि कृत्रिम सारख्या कंपन्या देखील AI मॉडेल विकसित करत आहेत. ही सर्व एआय मॉडेल्स वेळेवर लॉन्च झाली तर भारतीय वापरकर्त्यांचे ओपन एआय आणि जेमिनी एआयवरील अवलंबित्व संपुष्टात येईल.

  कोणत्या क्षेत्रांना होणार?

  याद्वारे गव्हर्नन्स, मॉडेल हेल्थ, शिक्षण आणि वित्त क्षेत्रांना मोठी मदत मिळणार आहे. तसेच, हा एक मैलाचा दगड ठरेल आणि कंपनीसाठी भारतजीपीटी विकसित करण्याचा मार्ग सुकर करेल. हनुमान चॅटबॉटच्या मदतीने, ज्यांना इंग्रजी येत नाही ते हिंदी आणि त्यांच्या प्रादेशिक भाषांमध्ये याचा वापर करू शकतील.