Airtel प्रमाणेच आता ‘या’ मोबाईल नेटवर्क कंपनीने दिला ग्राहकांना दणका! ‘हे’ 4 स्वस्त रिचार्ज प्लॅन्सच केले बंद

सध्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा (Use of Internet) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, विविध मोबाईल नेटवर्क कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स आणत आहेत. त्यातील काही प्लॅन्स परवडणारे आहेत तर काही प्लॅन्सचे दर वाढत्या महागाईवरून वाढले आहेत.

नवी दिल्ली : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा (Use of Internet) वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यानुसार, विविध मोबाईल नेटवर्क कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवे प्लॅन्स आणत आहेत. त्यातील काही प्लॅन्स परवडणारे आहेत तर काही प्लॅन्सचे दर वाढत्या महागाईवरून वाढले आहेत.असे असताना एअरटेलनंतर (Airtel) आता बीएसएनएलने (BSNL) ग्राहकांना मोठा दणका दिला आहे. कंपनीने तब्बल 4 रिचार्ज प्लॅन्स बंद केले आहेत.

BSNL ने चार रिचार्ज प्लॅन बंद केले आहेत. यापूर्वी एअरटेलने स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद केले होते. BSNL ने देखील स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्यासाठी एअरटेलचा मार्ग अवलंबला आहे. बीएसएनएलने 71, 104, 135 आणि 395 रुपयांचे प्लॅन्स बंद केले आहेत. या सर्व STV रिचार्ज प्लॅन्स आहेत. मात्र, बीएसएनएलने हे प्लॅन्स बंद का केले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचं कारण म्हणजे एअरटेलने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याऐवजी स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा फॉर्म्युला अवलंबला आहे. त्याच धर्तीवर बीएसएनएल आणि इतर कंपन्या ग्राहकांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करत आहेत.

STV योजना काय आहेत?

BSNL द्वारे STV प्लॅन्स आणले जात आहेत. हे विशेष टॅरिफ व्हाउचर आहेत. हा एक विशेष रिचार्ज आहे, जो एका विशिष्ट कालावधीसाठी लॉन्च केला जातो. परंतु, प्लॅनच्या लोकप्रियतेमुळे, बीएसएनएल या प्लॅनची ​​वैधता वाढवत आहे.

बीएसएनएलचा 71 रुपयांचा प्लॅन काय?

या प्लॅनमध्ये यूजर्सना 30 दिवसांसाठी 20 रुपयांचा टॉक-टाइम मिळत होता. या प्लॅनमध्ये डेटा आणि कॉलिंग सुविधा उपलब्ध नव्हती.

104 रुपयांचा प्लॅन काय?

या प्लॅनमध्ये युजर्सना 18 दिवसांची वैधता देण्यात येते. या प्लॅनमध्ये यूजर्सना 300 मिनिटे, 3GB डेटा आणि 30 SMS ची सुविधा मिळते. तसेच डिस्काउंट कूपनही देण्यात येते.

बीएसएनएलचा 135 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये 24 दिवसांची वैधता उपलब्ध होती. तसेच, कॉलिंगसाठी 1440 व्हॉईस मिनिटे ऑफर करण्यात आली होती.