बीएसव्‍हीने महाराष्ट्रामध्ये कॅप्टिव्ह सोलार पॉवर प्रकल्प सुरू करत शाश्वत विकासाशी आपल्या बांधिलकीचा केला पुनरुच्चार

बीएसव्‍हीच्या अंबरनाथ, महाराष्ट्र येथील उत्पादन केंद्राच्या हरित ऊर्जेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जलापव्यय टाळणे, एखाद्या उत्पादनाच्या निर्मितीप्रक्रियेचा पर्यावरणावर परिणाम होऊ नये यासाठीचे प्रयत्न (प्रोडक्ट स्टुअर्डशिप) आणि एकात्मिक व्यवस्थापन यंत्रणा राबविणे या प्रयत्नांच्या सोबतीने वर्ष तसेच २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी कंपनी म्हणून उदयास येण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांशीही ही नवी गुंतवणूक मेळ साधणारी आहे.

  • अंबरनाथमधील आपल्या उत्पादन केंद्राची सौरऊर्जेची गरज भागविण्यासाठी एएमपी एनर्जी सीअँडआय वन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक

मुंबई : भारताची अग्रगण्य बायोफार्मास्युटिकल कंपनी भारत सीरम्स आणि व्हॅक्सिन्स लि. (बीएसव्‍ही)ने एएमपी एनर्जी सी अँड आय प्रायव्हेट लिमिटेडटच्या संपूर्ण मालकीची कंपनी एएमपी एनर्जी सीअँडआय वन प्रायव्हेट लिमिटेडमध्ये आपले २६ टक्‍के समभाग फुल्ली डायल्युटेड तत्त्वावर गुंतवत पर्यावरणीय सामाजिक आणि प्रशासनिक लक्ष्यांप्रती (Environmental, Social and Governance – ESG) आपली कटिबद्धता नव्याने सिद्ध केली आहे.

यामुळे बीएसव्‍हीच्या अंबरनाथ, महाराष्ट्र येथील उत्पादन केंद्राच्या हरित ऊर्जेच्या गरजा पूर्ण होण्यास मदत होईल. त्याचबरोबर जलापव्यय टाळणे, एखाद्या उत्पादनाच्या निर्मितीप्रक्रियेचा पर्यावरणावर परिणाम होऊ नये यासाठीचे प्रयत्न (प्रोडक्ट स्टुअर्डशिप) आणि एकात्मिक व्यवस्थापन यंत्रणा राबविणे या प्रयत्नांच्या सोबतीने वर्ष तसेच २०५० पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन करणारी कंपनी म्हणून उदयास येण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांशीही ही नवी गुंतवणूक मेळ साधणारी आहे.

भविष्यकाळासाठी सर्वंकष शाश्वत विकासाचा आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ही गुंतवणूक बीएसव्‍हीला आपल्या प्रकल्पाच्या २५ वर्षे आयुर्मानाच्या कालावधीत प्रतिवर्ष ६५६० टन कार्बन डायऑक्साइड (tCO2e) इतके उत्सर्जन टाळण्यास मदत करेल.

याविषयी बोलताना भारत सीरम अँड वॅक्सिन्स लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ संजीव नवांगुळ म्हणाले, “बीएसव्‍हीमध्ये शाश्वततेचे मूल्य हे सर्वव्यापी आहे. पर्यावरण, कार्यस्थळ आणि समाज व सर्वच लाभार्थी गटांप्रती जपलेल्या जबाबदारीच्या भावनेमध्ये ते दिसून येते. आमच्या प्रत्येक कामामध्ये शाश्वततेचे मूल्य अंतर्भूत करण्याच्या दिशेने आही सतत प्रयत्नरत असतो. हा सौरऊर्जा प्रकल्पही मोजता येण्याजोगा सामाजिक परिणाम घडवून आणतानाच अधिक हरित वसुंधरेची उभारणी करणे, नैसर्गिंक संसाधनांचा विवेकाने वापर करणे आणि पुनर्नवीकरणीय ऊर्जास्त्रोतांचा वापर करणे या गोष्टींवरील आमच्या विश्वासाची ग्वाही देणारा आहे.”

भारत सीरम्स अँड वॅक्सिन्स लि.चे चीफ फायनान्शियल ऑफिसर चिराग मेहता म्हणाले, “एक जबाबदार कॉर्पोरेट कंपनी या नात्याने हवामान बदलाचे परिणाम टाळण्याशी आम्ही कटिबद्ध आहोत. या गुंतवणुकीमुळे सौरऊर्जा वापराचे प्रमाण वाढविणे आणि हे करताना ऊर्जावापराविषयीच्या नियमांचे पालन करणे तसेच २०३० पर्यंत आपल्या एकूण ऊर्जाक्षमतेमधील ४० टक्‍के ऊर्जा जीवाश्मेतर ऊर्जास्त्रोतांपासून मिळविण्याप्रती भारताने जाहीर केलेल्या बांधिलकीमध्ये आपला खारीचा वाटा उचलणे या गोष्टींप्रती आमचा दृढविश्वास नव्याने सिद्ध झाला आहे.”