iPhone 14 Pro खरेदी करताय! आधी जाणून घ्या काय त्रुटी आहेत नाहीतर…

iPhone 14 लाँच झाला आहे. खूप जण हा फोन घेण्यासाठी उत्सुक आहेत पण त्याच्यात काही त्रुटी असल्याची बाब समोर आली आहे. या फोनच्या कॅमेऱ्याबाबत काहींनी तक्रार केली आहे.

    नवी दिल्ली : वाजत गाजत Apple नवीन iPhone लॅान्च करण्यात आला. तो बाजारात येताच अनेकांची खरेदी करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडली. आताही अनेक जण iPhone विकत घेण्याच्या तयारीत असणार. मात्र त्यापुर्वी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे ती जाणून घेणं आवश्यक आहे. iPhone 14 Pro आणि Pro Max चा कॅमेऱ्यामध्ये त्रुटी आढळल्याची बाब समोर आली आहे.

    Apple च्या फोनमध्ये एक दोष सापडला युजर्सच म्हणण आहे. iPhone 14 Pro आणि Pro Max चा कॅमेरा अस्पष्ट आणि खराब दर्जाचा व्हिडीओ शूट करत असल्याची काही लोकांच्या निर्दशनास आली. MacRumors ला दिलेल्या निवेदनात ऍपलच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, ‘अनेक लोकांना इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, टिकटॉक सारख्या इन अॅप्सचा कॅमेरा वापरताना कॅमेरामध्ये काही त्रुटी जाणवत आहेत. काही युजर्सनी iPhone 14 Pro मध्ये थर्ड पार्टी अॅप्सच्या कॅमेऱ्यातून व्हिडीओ रेकॉर्ड केल्यावर व्हिडीओच्या क्वॉलिटी बद्दल तक्रार केली आहे . त्याचबरोबर काहींच्या कॅमेऱ्यातून कॅमेरा मोड बदलूनही अस्पष्ट आणि निकृष्ट दर्जाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग होत असल्याची बाब समोर आली आहे. या समस्येबाबत स्पष्टीकरण देतान Apple ने सांगितले की, पुढील आठवड्यापर्यंत ही समस्या दूर होईल.