vi plans

व्होडाफोन-आयडिया (VI) ने आपल्या प्रिपेड प्लॅन्सच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (VI Prepaid Plans Rate Change)कंपनीतर्फे आज ही माहिती देण्यात आली.

    मुंबई : व्होडाफोन-आयडिया (VI) ने आपल्या प्रिपेड प्लॅन्सच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (VI Prepaid Plans Rate Change)कंपनीतर्फे आज ही माहिती देण्यात आली. नवे प्लॅन्स २५ नोव्हेंबरपासून म्हणजे बुधवारपासून लागू होतील. नव्या प्लॅनमुळे प्रत्येक यूझरकडून मिळणाऱ्या नफ्यात वाढ होणार आहे. यामुळे आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास कंपनीला मदत होईल. दोन दिवसांपूर्वीच भारती एअरटेलनेही आपल्या प्रिपेड प्लॅन्सच्या(Airtel Prepaid Plans) किमती २५ टक्क्यांनी वाढवल्या आहेत.

    VI चे देशभरात २७ गोटी ग्राहक आहेत. यात प्रिपेड आणि पोस्टपेड या दोन्ही ग्राहकांचा समावेश आहे. वाढणाऱ्या किमतीचा फटका प्रिपेड ग्राहकांना सहन करावा लागणार आहे. एयरटेल आणि VI नंतर आता रिलायन्स जिओही आपले प्रिपेड प्लॅन्स महाग करण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत रिलायन्सचे प्रिपेड प्लॅन्स सर्वाधिक कमी आहेत.

    VI चे प्रीपेड वापरणाऱ्यांना आता ७९ रुपयांच्या प्लॅनसाठी ९९ रुपये मोजावे लगणार आहेत. म्हणजे सर्वात स्वस्त प्लॅनसाठी आता ग्राहकांना २० रुपये जास्त मोजावे लागतील. वार्षिक व्हॅलिडिटीच्या प्लॅनची किंमत २३९९ वरुन, २८९९ करण्यात आली आहे. म्हणजे वर्षभरासाठी ५०० रुपये जास्त मोजावे लागतील. कंपनीने टॉप अप प्लॅन्सही महाग केले आहेत.