मॅन्युअल बीपी मॉनिटरच्या तुलनेत डिजिटल बीपी मॉनिटरबाबत असणारी काळजी आणि गैरसमज

प्रौढ आणि तरूण व्यक्तिंमध्ये सर्रास आढळून येत आहेत. औषधे आणि जीवनशैली बदलल्याने, रक्तदाब नियमित तपासून घेणे महत्त्वाचे ठरते. रक्तदाब नियंत्रणात राखल्यास आरोग्यदायक जीवन शक्य आहे. हाताने तपासता येतो असा मॅन्यूअल किंवा डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर (डीबीपीएम) वापरता येतो.

  भारत आणि जगभरातील लक्षावधी व्यक्ति हायपरटेंशन (Hypertension) किंवा उच्च रक्तदाबग्रस्त (High BP) असतात. अनेकदा काही विकार जडत असताना त्यांची लक्षणे दिसून येत नाहीत आणि हे विकार जीवघेणे “जीवनशैली संबंधी आजार” असल्याने आरोग्याच्या अनेक गुंतगुंतीना आमंत्रण देतात.

  दरम्यानच्या वर्षांत प्रौढ आणि तरूण व्यक्तिंमध्ये सर्रास आढळून येत आहेत. औषधे आणि जीवनशैली बदलल्याने, रक्तदाब नियमित तपासून घेणे महत्त्वाचे ठरते. रक्तदाब नियंत्रणात राखल्यास आरोग्यदायक जीवन शक्य आहे. हाताने तपासता येतो असा मॅन्युअल किंवा डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर (डीबीपीएम) वापरता येतो.

  अर्थात दोन्ही प्रकारच्या मॉनिटरचे फायदे असले तरीही आपल्या दृष्टीने आदर्श ठरेल अशा मॉनिटरची निवड करणे रास्त ठरते. तसेच या उपकरणांविषयी असलेली काळजी आणि गैरसमजांविषयी जागरूक असले पाहिजे.

  अचूकतेबद्दल काळजी

  हाताने तपासता येतो असा मॅन्युअल मॉनिटरच्या (Manual Monitor) तुलनेत डिजिटल मॉनिटर (Digital Monitor) कमी अचूक असतो ही सर्वसाधारण चिंता असते. मॅन्युअल पद्धतीच्या मॉनिटरमध्ये रीडिंगवर परिणाम करणारे काही घटक असतात. वैद्यकीय क्षेत्रात शिकवताना मॅन्युअल मॉनिटर हाताळण्यास सर्वप्रथम शिकवले जाते.

  रक्तदाब मोजणाऱ्या व्यक्तीचे कौशल्य आणि मूल्यमापनाची बाह्य स्थिती यावर मोजमापासंबंधी चुकांचे प्रमाण अवलंबून असते. उदाहरणार्थ, बाहेरील वातावरणात भरपूर गोंगाट असल्यास या पद्धतीवर परिणाम होतो. तसेच अचूक मोजमाप घेण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण या प्रक्रियेसाठी योग्यप्रकारे तयार केलेले असावे. या उपकरणाचा पट्टा हाताने चुकीच्या पद्धतीने बांधणे, उपकरणाची स्थिति आणि वय तसेच उच्च रक्त प्रवाह या काही सर्वसाधारण घटकांचा परिणाम अशा पद्धतीच्या रीडिंगवर होतो.

  दुसरीकडे, डिजिटल बीपी मॉनिटर मोजमापावर गोंगाटासारख्या बाह्य घटक व मोजमापाच्या व्यक्तिनिष्ठ मूल्यमापनावर काही परिणाम होत नाही. आपण उपकरणाच्या माहितीपुस्तिकेनुसार सूचनांचे पालन केल्यास हे मॉनिटर अचूक रीडिंग देतात. अगदी रक्तप्रवाह अधिक प्रमाणात असल्यास डिजिटल मॉनिटर चांगल्याप्रकारे काम करतात, आणि रीडिंग घेण्यापूर्वी उपकरणाच्या योग्य सेटअपबद्दल चिंता बाळगण्याची आवश्यकता नसते (उपकरण व्यवस्थित बसवले आहे याची खातरजमा करा).

  व्यावसायिकाने मोजमाप केल्यास डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर अचूक काम करतो

  डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरने घेतली जाणारी रीडिंग मॅन्युअल मॉनिटरने घेण्यात येणाऱ्या व्यावसायिक मोजमापाइतकी व्यावसायिक असते. त्यात ऑस्कील्लोमेट्रिक पद्धतीचा वापर रक्तदाब तपासण्यासाठी करण्यात येतो. आपण आपले उपकरण कसे निवडतो आणि कशाप्रकारे ठेवतो त्यावर अचूकता अवलंबून असते.

  डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटरचे फायदे

  डिजिटल बीपी मॉनिटरचे डिझाईन हे घरी सहज, अगदी पहिल्यांदा वापरणारे आणि घरी एकटे राहणारे, इतरांच्या मदतीशिवाय वापरता येईल अशापद्धतीने केलेले असते. त्यात ब्ल्यूटुथ कनेक्टीव्हीटी असल्याने एखादी व्यक्ति अत्याधिक अचूक माहितीसह चालू आणि अगोदरची रीडिंग तज्ज्ञांना पाठवू शकते. डिजिटल मॉनिटर हे त्यांचा लहान आकार आणि हलक्या वजनामुळे पोर्टेबल असतात.

  त्यांचे काही बाह्य भाग असतात आणि ते सेन्सरच्या साह्याने सहज डेटा रेकॉर्ड करू शकतात, ज्यामुळे हा एक वापरकर्ता-स्नेही पर्याय ठरतो. अपघाताने त्याचे नुकसान होईल किंवा बाह्य भाग प्रवास करताना गहाळ झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही. जसे मॅन्युअल पद्धतीचा मॉनिटर हाताळताना घडू शकते. अनेकदा मोजमापाचा हिशेब ठेवण्यासाठी व्यक्तिला अनेक उपकरणे बाळगावी लागतात, त्यांच्यासाठी हा पर्याय अगदी योग्य आहे.

  आपण डिजिटल बीपी मॉनिटर घरी वापरू शकतो, शिवाय डॉक्टरांच्या कार्यालयात आपल्या रक्तदाबाचा ट्रॅक ठेवण्याच्या दृष्टीने ती उपयुक्त असतात हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. आपण उच्च रक्तदाबाकरिता औषधे घेतो किंवा मधुमेह अथवा हृदयरोग अशा अन्य रक्तदाबावर परिणाम करणारी स्थिती असल्यास डिजिटल मॉनिटर आपल्याला बदलणारी रीडिंग ट्रॅक ठेवण्यास साह्य करतो. जेणेकरून त्यांचे अचूक समायोजन करणे शक्य होते.

  त्यामुळे डिजिटल बीपी मॉनिटरच्या वापराबद्दल अनेक चिंता आणि गैरसमज असतात हे आपले म्हणणे तितकेसे खरे नाही. आपण रक्तदाब मोजण्याकरिता डॉक्टरांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन जितके करू, तितके अचूक रीडिंग घेणे आपल्याला शक्य होईल.

  कोटारो सुझुकी

  (व्यवस्थापकीय संचालक, ओमरॉन हेल्थकेअर इंडिया)