
Honor 90 चे बेस मॉडेल ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज येते. त्या फोनवर 7000 रुपयांचा फेस्टिव्ह डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय SBI कार्ड असणाऱ्यांना 4 हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते.
अॅमेझॉनचा फेस्टिव्हल सेल म्हणजेच ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2023 हा 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. सेलमध्ये Honor 90 5G या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळणार आहे. Honor 90 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर, 200 मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि इतर स्पेसिफिकेशन्स मिळतात.
Honor च्या या नवीन फोनमध्ये 6.7 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळणार आहे. याचे रिझोल्युशन हे 1.5 के आहे. याचा रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका आहे. या फोनला Qualcomm स्नॅपड्रॅगन 7 Gen 1 SoC सपोर्ट येतो. ज्यात 128 जीबी LPDDR5 रॅम आणि 256 जीबी इतके UFS 3.1 इनबिल्ट स्टोरेजसह जोडण्यात आपले आहे. हा फोन अँड्रॉइड 13आधारित OS 7.1 वर चालणारा आहे.
तसेच Honor 90 5जी स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. अल्ट्रा वाइड अँगलसह 12 मेगापिक्सलचा सेन्सर आणि LED फ्लॅश युनिटसह 2 मेगापिक्सेलची मॅक्रो लेन्स देखील या सेटअपमध्ये मिळते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा युझर्सना मिळणार आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना 5000 mAh क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. यासाठी यामध्ये 66W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. सुरक्षेसाठी यात फोन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, ड्युएल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, NFC, GPS आणि USB टाइप-सी अशी फीचर्स यात मिळतात.
Amazon चा सेल 8 तारखेपासून सुरू होणार आहे. 8 ते 18 ऑक्टोबर दरम्यान या स्मार्टफोनवर फेस्टिव्हल डिस्काउंट मिळणार आहे. तसेच प्राइम सदस्य असणाऱ्यांना या सेलमध्ये 7 तारखेपासून प्रवेश मिळणार आहे. सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Honor 90 चे बेस मॉडेल ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज येते. त्या फोनवर 7000 रुपयांचा फेस्टिव्ह डिस्काउंट मिळणार आहे. याशिवाय SBI कार्ड असणाऱ्यांना 4 हजारांची अतिरिक्त सूट मिळू शकते. यामुळे या फोनची किंमत 26,999 रुपयांपर्यंत कमी होते. याचप्रमाणे Honor 90 च्या 12 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे. या मॉडेलवर देखील सूट मिळणार आहे. 8 ते 18 ऑक्टोबर दरम्यान या मॉडेलवर 6 हजारांचा डिस्काउंट, SBI चे कार्ड असणाऱ्यांना 4 हजारांची सूट मिळणार आहे. ज्यामुळे या मॉडेलची किंमत 29,999 रुपये इतकी होते.