Instagram ऐकतोय तुमचं बोलणं? अॅपला कशा समजतात आपल्या मनातील गोष्टी? कंपनीच्या सीईओने स्वत:च केला खुलासा
सोशल मीडिया ॲप इंस्टाग्राम आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनले आहे. इंस्टाग्रामवर आपण स्टोरीज आणि पोस्ट शेअर करत असतो. तसेच इंस्टाग्रामवर शेअर केल्या जाणाऱ्या रिल्सच्या मदतीने इन्फ्लुएन्सर्स चांगलेच पैसे कमवतात. इंस्टाग्राम एक लोकप्रिय ॲप असला तरी देखील या ॲपबाबत सतत तक्रारी येत असतात आणि यातीलच एक सामान्य तक्रार म्हणजे इंस्टाग्राम आपलं बोलणं ऐकतो आणि त्याच संबंधित जाहिराती आणि रिल्स आपल्याला दाखवतो.
तुम्ही अनेक लोकांची तक्रार ऐकली असेल की इंस्टाग्राम तुमचं बोलणं ऐकतो आणि त्याचंसंबंधित जाहिराती तुम्हाला दाखवतो. मात्र हे खरं आहे का? याबाबत आता इंस्टाग्रामचे प्रमुख एडम मोस्सेरी यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एडम मोस्सेरी यांनी सांगितलं की, इंस्टाग्राम तुमचं बोलणं ऐकतो ही एक निव्वळ अफवा आहे. जरं खरंच असं झालं असतं तर हे यूजर्सच्या प्रायव्हसीचे गंभीर उल्लंघन असतं. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर मेटा फोनच्या मायक्रोफोनद्वारे काहीतरी ऐकत असेल तर यूजर्सना ते लक्षात आले असते. कारण जेव्हा असं घडतं तेव्हा तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ शकते आणि मायक्रोफोन इंडिकेटर लाईट चालू राहते. त्यामुळे, असे संकेत दिसत असतील तर दावा केला जाऊ शकतो की सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम तुमचं बोलणं ऐकत आहे. मात्र असं होत नाही. त्यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम युजर्सचं बोलणं ऐकतो असा आरोप करणं काही प्रमाणात चुकीचं ठरू शकतं. आता असा प्रश्न निर्माण होतो की, जर इंस्टाग्राम युजर्सचं बोलणं ऐकत नाही मग युजर्सना संबंधित जाहिराती कशा दिसतात?
गेल्या अनेक वर्षांपासून असा दावा केला जात आहे की, मेटा फोनच्या माइकद्वारे युजर्सचं बोलणं ऐकतो. त्यामुळेचं युजर्सना संबंधित जाहिराती दिसतात. मोसेरी म्हणाले की त्यांच्या पत्नीनेही यावर प्रश्न उपस्थित केला होता. तथापि, मेटाने हे आरोप सातत्याने नाकारले आहेत. गेल्या काही वर्षांत, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.
फेसबुक आणि इंस्टाग्रामसह मेटाच्या अनेक ॲप्सवर अशा जाहिराती दिसू लागतात ज्या वस्तूंची त्यांना गरज आहे. या त्याच वस्तू असतात ज्या युजर्स ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईटवर सर्च करत असतात. जर मेटा युझर्स बोलणे एकच नसेल तर या जाहिराती दिसणं कसं शक्य आहे? मोसेरी यांनी सांगितलं आहे की, हे सर्व अलोरिथममुळे शक्य होते. त्यांनी म्हटलं आहे की जाहिराती देणार्या कंपनी त्यांच्या वेबसाईटला भेट देणाऱ्या युजर्सचा डेटा मेटासोबत शेअर करतात. यानंतर मेटा त्यांची प्रोफाइलिंग करतो त्यानंतर असे काही युजर्स निवडले जातात ज्यांचा इंटरेस्ट सारखा आहे आणि अशा यूजर्सना या जाहिराती दाखवल्या जातात. अनेकदा हे ट्रेडिंग टॉपिक्स असतात. हे टॉपिक युजर्सना जास्त आवडतात त्यामुळे या संबंधित जाहिराती सतत दाखवल्या जातात.






