dyson zone headphone

Dyson Zone आणि Dyson Zone Absolute+ असे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. या व्हेरियंटमध्ये अल्ट्रा ब्लू आणि पार्शियन ब्लू असे दोन रंग उपलब्ध आहेत.

    डायसन कंपनीने बाजारात एक नवीन प्रोडक्ट् लाँच केलं आहे. कंपनीने Dyson Zone हेडफोन लाँच केले आहे.Dyson Zone Headphone भारतात 4ऑक्टोबरला लाँच करण्यात आले. हे नवीन हेडफोन ओव्हर-द-इअर ब्लूटूथ हेडफोन्स मेटल ग्रिल आणि रिमुव्हेबल फेस वायजरसह उपलब्ध आहे. हा नवीन हेडफोन आंतरराष्ट्रीय बाजारात याआधीच लाँच झाला होता. भारतात तो आत्ता लाँच झाला आहे.

    फीचर्स
    या हेडफोनची खासियत म्हणजे तुम्हाला 50 तासांचा कंटीन्यु प्लेबॅक टाइम मिळेल. यात ॲडव्हान्स नॉइस कॅन्सलेशन आणि जबरदस्त ऑडिओ आउटपुट मिळेल. या हेडफोनसोबत डिटॅचेबल वायसरदेखील आहे. ज्यामुळे एअर प्युरिफायर होण्यास मदत होईल. हा हेडफोन चार्ज होण्यासाठी 3 तास लागतील. यामध्ये 11 मायक्रोफोनचा वापर केला आहे. त्यातील 8 मायक्रोफोनचा वापर आजूबाजूचा आवाज कमी करण्यासाठी होतो.

    यामध्ये एक Transparent Mode देण्यात आला आहे. याचा वापर करुन तुम्ही आवाज कमी करु शकता. हेडफोनमध्ये अतिरिक्त मायक्रोफोन देण्यात आला आहे. ज्याचा वापर कॉलिंग, रेकॉर्डिंग, व्हॉइस कंट्रोल इत्यादीसाठी केला जाऊ शकतो.

    किंमत आणि प्रकार
    कंपनीने नवीन हेडफोन दोन प्रकारात लाँच केले आहे. Dyson Zone आणि Dyson Zone Absolute+ असे दोन व्हेरियंट लाँच करण्यात आले आहेत. या व्हेरियंटमध्ये अल्ट्रा ब्लू आणि पार्शियन ब्लू असे दोन रंग उपलब्ध आहेत. तर Dyson Zone Absolute+ मध्ये ब्राइट कॉपर आणि पर्शियन ब्लू रंगामध्ये खरेदी करु शकता. हे नवीन हेडफोन तुम्ही Dyson च्या अधिकृत वेबसाइट आणि Dyson Demo स्टोरमध्ये खरेदी करु शकतात.

    या हेडफोनची किंमत 59,900 रुपयांपासून सुरू होते. तर Dyson Zone Absolute+ व्हेरियंटची किंमत 64,900 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तुम्ही हिशेब केला तर जाणवेल की या हेडफोनची किंमत ही एका बाईकच्या किमतीएवढी आहे. कंपनी या हेडफोनसोबत इलेक्ट्रो स्टॅटिक कार्बन, व्हिलर क्लीनिंग ब्रश, युएसबी-सी चार्जिंग केबल आणि वायझर स्लीव्हस देते.