आता X वरून करता येणार ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल, फोन नंबरचीही भासणार नाही गरज !

जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यात ट्विटर अर्थात X, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे युजर्सला चांगला अनुभव घेता यावा, यासाठी कंपन्यांचे प्रयत्न असतात. त्यात आता X चे (ट्विटर) सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी युजर्सवर लक्ष केंद्रीत करत एक मोठी घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली : जगभरात इंटरनेटचा वापर वाढला आहे. त्यात ट्विटर अर्थात X, इन्स्टाग्राम, व्हॉट्सऍप यांसारख्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे युजर्सला चांगला अनुभव घेता यावा, यासाठी कंपन्यांचे प्रयत्न असतात. त्यात आता X चे (ट्विटर) सर्वेसर्वा एलॉन मस्क (Elon Musk) यांनी युजर्सवर लक्ष केंद्रीत करत एक मोठी घोषणा केली आहे.

    एलॉन मस्क यांनी सांगितले की, X मध्ये आता लवकरच ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल फीचर दिले जाणार आहे. हे नवीन फीचर अँड्रॉइड, आयओएस, पीसी आणि मॅकशी संबंधित असणार आहे. इतकेच नाहीतर यासाठी कोणत्याही फोन नंबरची गरज भासणार नाही. तरीदेखील ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करता येऊ शकणार आहे, असा दावा मस्क यांनी केला आहे.

    एका ट्विटमध्ये मस्क यांनी म्हटले की, ‘X वर व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल येत आहे. या वैशिष्ट्याबद्दल सविस्तर माहितीही दिली आहे. ज्यामुळे हे फिचर आधुनिक असे बनले आहे. या नवीन फीचरमध्ये फोन नंबरची आवश्यकता भासणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.