experienced Zero Shadow Day in kalyan

आपली सावली कधी आपली साथ सोडत नाही.मात्र निसर्ग आणि भूगोलातील काही शास्त्रीय घडामोडींमुळे सावलीनेही आपली साथ सोडल्याने काही वेळेला सावली देखील साथ सोडते. हा दिवस म्हणजे शून्य सावली दिवस(experienced Zero Shadow Day in kalyan).

    यंदा महाराष्ट्रात जवळपास सर्वच ठिकाणी शून्य सावली दिवस अनुभवता आला. याचा अनुभव आज कल्याण डोंबिवलीकरांना आला.

    ‘शून्य सावली दिवस’ या भौगोलिक घटनेचं कुतूहल सगळ्यांना असतं. हा सावल्यांचा खेळ सर्वांनाच आनंददायी वाटतो. आपल्या आजूबाजूला खेळणारी सावली काही क्षणांसाठी आपली साथ सोडून जाते.

    हे कुतूहल अनुभवण्यासाठी सुभेदारवाडा कट्टा या संस्थेच्या माध्यमातून सुभाष मैदानात करण्यात आलं होते. या कार्यक्रमात गजानन विद्यालयात विद्यार्थी व शिक्षक पालकांनी सहभाग घेतला होता.