x वर पाहता येणार चित्रपट, एलॉन मस्कची मोठी घोषणा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर आता आणखीन एक नवीन फीचर लाँच केले जाणार आहे. आता युझर्स फिल्म, टीव्ही मालिका,पॉडकास्ट हे सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करु शकणार आहेत.

    शुक्रवारी Tesla आणि Space X चे सीईओ एलॉन मस्क यांच्याद्वारे एक मोठी घोषणा करण्यात आली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) आता युझर्ससाठी चित्रपट, टीव्ही मालिका आणि पॉडकॉस्ट पोस्ट सुरु करण्यात येईल. तर मोनेटायझेशनच्या (Monetization) माध्यमातून त्यांना पैसेही कमवता येतील. एलॉन मस्क आणि त्याची बहिण टोस्का मस्क या दोघांमधील सोशल मीडियातील संवादातून ही बातमी समोर आली आहे. बहिणीच्या प्रश्नाला एलॉनने उत्तर दिले आहे. त्यात त्याने चित्रपट, टीव्ही मालिका, पॉडकॉस्ट एक्सवर पोस्ट करण्याची माहिती दिली आहे.

    शुल्काची लागलीच मागणी

    एलॉन मस्कची बहिण टोस्काने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आता ऑडियंसला एक्सवर चित्रपट सुद्धा पाहता येणार आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. तर काही युझर्सने लागलीच विना सब्सक्रिप्शन चित्रपट पाहण्यासाठी युझर्सला वन टाईम शुल्क ठेवण्याचे आवाहन केले आहे.

    एआय ऑडियंस फीचर

    याबरोबरच एलॉन मस्क त्याच्या फॉलोअर्ससाठी एआय ऑडियन्स हे नवीन फीचर घेऊन येणार आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या टार्गेट ऑडियन्सपर्यंत अगदी सहज व लवकर पोहचू शकता. हे एआय सिस्टम काही सेकंदातच जाहिरातीसाठी मदत करेल. हे फिचर तुम्हाला तुमच्या इच्छित ऑडियंस पर्यंत पोहचण्यास मदत करेल.

    एक्सवर मोजा पैसा

    एलॉन मस्क याने X वर आतापर्यंत अनेक मोठे निर्णय आणि बदल केले आहेत. त्यातच आता मस्क युझर्सला एक नवीन झटका देणार आहेत. Blue Tick द्वारे मस्कने अगोदरच युझर्सकडून वसुली करण्यास सुरुवात केली होती. त्यातच आता पुन्हा एकदा X यूजर्सकडून पैसे वसूल करण्यात येणार आहे. आता एक्सवरील एखादी पोस्ट लाईक करायची असल्यास, कोणत्या पोस्टवर रिप्लाय द्यायचे असल्यास एवढेच नव्हे तर बुकमार्क करण्यासाठी सुध्दा ग्राहकांचा पैसे द्यावे लागणार आहेत. म्हणजेच आता युझर्सचा चांगलाच खिसा कापला जाणार आहे.

    प्रोढांसाठी विशेष कंटेंट

    एक्सवर प्रौढ कंटेंटसाठी आता युझर्स एक कम्युनिटी तयार करु शकतील. यासाठी त्यांना फक्त सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील. याविषयीची माहिती लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. याविषयीची माहिती देताना Daniel Buchuk यांनी स्क्रीनशॉट ॲनालिस्ट शेअर केला आहे. डॅनिअल ॲप्स विकसाबाबत माहिती जमा करतो आणि त्याविषयीची अपडेटेड माहिती युझर्सला पुरवतो. एक्सच्या सेटिंगमध्ये लवकरच युझर्सला अनेक बदल झालेले दिसून येतील. लवकरच साधं कंटेंट आणि प्रौढ कंटेंट अशा नामफलक, लेबल लागलेले दिसतील. हे बदल युझर्सच्या सहज नजरेत येतील.