फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डाने २० लाख वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला

  • सर्वाधिक वेगाने २० लाख कार्डांचा टप्पा गाठणारे एक को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड
  • प्रादेशिक पातळीवरील सखोल वितरणासह भारतभरातील १८००० हून अधिक पिन कोड्सचा समावेश

बंगळुरु आणि मुंबई : फ्लिपकार्ट (Flipkart) या भारतातील एतद्देशीय ई-कॉमर्स (E-Commerce) बाजारपेठ आणि ॲक्सिस बँक (Axis Bank) या भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खासगी बँकेने आज घोषणा केली की ‘फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड’ या त्यांच्या को-ब्रँडेड क्रेडिट कार्डाने २० लाख कार्ड्स इन फोर्स (सीआयएफ) चा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. २०१९ मध्ये सादर झालेल्या या कार्डामुळे वापरकर्त्याला अनेक सोयी आणि लाभांसोबतच या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कॅशबॅक, सुविधा आणि सहजसोपी प्रणाली उपलब्ध होते.

हे को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सहज आहे आणि क्रेडिट घेण्याची क्षमता असलेले ग्राहक तसेच नेहमीच्या क्रेडिट कार्डांची मर्यादित उपलब्धता असलेले ग्राहक अशा दोन्ही वर्गांना सेवा देण्याच्या दृष्टीने या कार्डाची रचना करण्यात आली आहे.

भारतातील १८००० हून अधिक पिन कोड्ससह हे कार्ड एक सर्वाधिक वितरण असलेले कार्ड आहे. यातील सुमारे १० लाख कार्ड एका वर्षात जारी करण्यात आले आहेत. ऑनलाइन प्रणालीचा वापर आणि डिजिटल व्यवहारांमध्ये झालेली वाढ यामुळे हा आकडा गाठला गेला.

या कार्डाच्या वापरकर्त्यांमध्ये होत असलेली वाढ म्हणजे वाढत्या डिजिटल परिसंस्थेत नाविन्यपूर्ण वित्त पर्याय आणि क्रेडिट सुविधांची ग्राहकांची मागणी वाढत असल्याचे द्योतक आहे. या कार्डाच्या सुविधांमध्ये सर्व खरेदीवर अमर्याद कॅशबॅक, फ्लिपकार्ट आणि मिंत्रावरील खरेदीवर ५ टक्के कॅशबॅक, क्लीअरट्रिप, क्यूअरफिट, पीव्हीआर, टाटा १एमजी, ऊबर अशा महत्त्वाच्या ब्रँडच्या खरेदीवर ४ टक्के कॅशबॅक अशा सुविधांचा समावेश आहे.

इतर सर्व प्रकारच्या खर्चांवर यात १.५ टक्के कॅशबॅक मिळतो जो या क्षेत्रात सर्वाधिक आहे. या कार्डावर कोणत्याही कटकटीविना थेट कॅशबॅक मिळण्याचा उत्कृष्ट अनुभव मिळतो आणि याचे प्रतिबिंब ग्राहकांच्या क्रेडिट कार्ड स्टेटमेंटमध्येही दिसते.

फ्लिपकार्ट आणि ॲक्सिस बँक या दोन्ही कंपन्या सातत्याने नवनवीन डिजिटल फर्स्ट पर्याय देऊ करत ग्राहकांना सोयी पुरवण्यास प्रयत्नशील आहेत. हे कार्ड जारी करण्याची प्रक्रिया सुरुवातीपासून शेवटपर्यंत डिजिटल, पेपरलेस आहे आणि केवायसी प्रक्रिया गाळण्यासाठी यात व्हिडीओ व्हेरिफिकेशन केले जाते. सध्या, ४० टक्क्यांहून अधिक कार्ड्स कोणत्याही प्रत्यक्ष सहभागाविना जारी केले गेले आहेत.

‘कार्ड कन्सोल’ ही सुविधा उपलब्ध करून देत या कार्डाने ग्राहकसुविधेत एक नवा मापदंड स्थापित केला आहे. या सुविधेत वापरकर्त्यांना फ्लिपकार्ट ॲपवर कार्डासंबंधीची सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळते. या सुविधेत वापरकर्त्यांना मासिक स्टेटमेंट पाहता येतात, ट्रान्झॅक्शन पाहता येतात, बिल पेमेंटचे पर्याय निवडता येतात, क्रेडिट लिमिट वाढवता येते आणि संपर्करहित पेमेंट्स आणि इतर मासिक व्यवहारांसाठी मर्यादा ठरवता येते. या सोयींमुळे अधिक प्रमाणात ग्राहक व्यवहार होत आहेत आणि कार्ड जारी झाल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यात ८५ टक्क्यांहून अधिक कार्ड ॲक्टिव्हेशनसह वापरातही वाढ झाली आहे.

फ्लिपकार्टच्या फिनटेक ॲण्ड पेमेंट ग्रूपचे प्रमुख आणि वरिष्ठ उपाध्यक्ष धीरज अनेजा म्हणाले, “आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून ग्राहकांना परिपूर्ण, वाजवी दरातील आणि सहजसोपा अनुभव पुरवण्यात फ्लिपकार्ट नेहमीच आघाडीवर राहिला आहे. मागील काही वर्षांपासून, लाखो भारतीयांसाठी ते एक सर्वाधिक प्राधान्यक्रमाचे लाईफस्टाईल शॉपिंग स्थळ बनले आहे. उपलब्धता आणि वाजवी दर असणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि सुरक्षित सेवा आमच्या ग्राहकांना पुरवण्यास आम्ही बांधिल आहोत आणि फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. भारतीय ग्राहक अधिक सजग झाले आहेत आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात त्यांच्यामध्ये जीवनशैली उंचावण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली आहे आणि ती वाढते आहे. को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड ग्राहकांची खरेदीची क्षमता वृद्धिंगत करण्यात साह्य करून या क्षमतेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहे.”

ॲक्सिस बँकेच्या कार्ड्स ॲण्ड पेमेंट्स विभागाचे प्रमुख आणि ईव्हीपी संजीव मोघे म्हणाले, “ॲक्सिसने आपल्या सर्व व्यवसायांमध्ये ग्राहकांच्या इच्छांवर लक्ष केंद्रीत करत मुक्त तत्वांचा अवलंब केला आहे. या तत्वाचे एक लखाखते उदाहरण म्हणजे हे को-ब्रँडेड कार्ड. या क्षेत्रातील हा एक आघाडीचा को-ब्रँड आहे आणि वाढते प्रमाण आणि अवलंब म्हणजे त्याच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे. आमच्या या प्रवासाची सुरुवात दमदार पातळीवर झाली असली तरी एका वापरण्यास सोप्या अशा कन्सोलमधील सर्व सुविधा आणि नियंत्रणांची उपलब्धता यामुळे ग्राहकांना कायम सोबत ठेवता आले. कार्ड जारी करण्याचे प्रमाण आणि वापराची आकडेवारी यातून हे दिसून येतेच. देशभरातील आमच्या सर्व ग्राहकांसाठी भविष्यासाठी सज्ज उत्पादने देऊ करत डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोन बाळगण्यास आम्ही बांधिल आहोत.”

नेहमीचे क्रेडिट कार्ड आजघडीला विविध स्वरुपात उपलब्ध असले तरी पारंपरिक चौकटीत आजही अनेक ग्राहकांना क्रेडिट कार्डाची सुविधा उपलब्ध नाही. फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड हे क्रेडिट आणि रिटेल अधिक सर्वसमावेशक बनवण्यास प्रयत्नशील आहे. या कार्डाच्या काही प्राथमिक सुविधांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे:
• फ्लिपकार्ट आणि मिंत्रावर ५ टक्के अमर्याद कॅशबॅक
• प्राधान्यक्रमाच्या मर्चंट्सकडे ४ टक्के अमर्याद कॅशबॅक
• इतर कोणत्याही मर्चंटकडे केलेल्या खर्चावर १.५ टक्के अमर्याद कॅशबॅक उपलब्ध (ऑनलाइन आणि ऑफलाइन)
• विविध राष्ट्रीय विमानतळांवर ४ मोफत लाऊंज ॲक्सेस (दर तिमाहीत एक)