motorola phone

मोटोरोला कंपनीने आपल्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट सेल आणि ऑफर लॉन्च केली आहे.

  फ्लिपकार्टचा (Flipcart) यावर्षीचा बिग बिलियन डेज सेल 8 ऑक्टोबरपासून सुरु होतोय. या सेलमध्ये फ्लिपकार्ट प्लसचे सदस्य असणाऱ्या ग्राहकांना या सेलमध्ये 7 ऑक्टोबरपासून प्रवेश मिळणार आहे. सेल सुरु होण्यासाठी 7-8 दिवस शिल्लक आहेत. मात्र मोटोरोला कंपनीने आधीच ग्राहकांना आपल्या स्मार्टफोन्सवर डिस्काउंट सेल आणि ऑफर लॉन्च केली आहे. कंपनी मोटोरोला Edge, मोटो Gआणि मोटो E सिरीजवर काही ऑफर्स घेऊन आली आहे. (Flipkart Big Billion Days 2023)

  मोटोरोला Edge 40 Neo
  मोटोरोला कंपनीने मोटोरोला Edge 40 Neo भारतात लॉन्च केला आहे. बिग बिलियन डेज सेलमध्ये सर्व बँक ऑफर्ससह 8 जीबी रॅम आणि 128 जीबी व्हेरिएंटसाठी 19,999 रुपये आणि 12/256 जीबी व्हेरिएंटसाठी 21,999 रुपयांमध्ये हा फोन घेता येईल. या डिव्हाइसची मूळ किंमत 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 23,000 रुपये आणि 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी 25,999 रुपये इतकी आहे. मोटोरोला एज 40 निओ या स्मार्टफोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना 6.5 इंचाचा pOLED डिस्प्ले आहे. या फोनला 68W चार्जिंग स्पोर्टसह 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

  मोटो G54 5G
  फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये फोन बघत असाल तर तुमच्यासाठी Moto G54 5G हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असणाऱ्या बेस व्हेरिएंटची किंमत 15,९९९ रुपये आहे. तर या सेलमध्ये हा फोन 12,999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तर 12 जीबी रॅम 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेले मॉडेल 8 ऑक्टोबरपासून 14,999 रुपयांच्य किंमतीत उपलब्ध असणार आहे.

  मोटो G84 5G
  तुम्ही जर का 20 हजार रुपयांच्या आतमधील स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी Moto G84 हा एक चांगला पर्याय असू शकतो. 19,000 रुपये किंमत असलेला हा फोन सेलमध्ये 16,999 रुपयांना उपलब्ध असेल. मोटो G84 5G मध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये 5000 mAh खमतेची बॅटरी तसेच 6.55 इंचाचा डिस्प्ले आणि 50 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेऱ्या वापरकर्त्यांना मिळणार आहे.

  मोटो e13
  मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची मूळ किंमत 8,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये तो 6,749 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. या फोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसरचा सपोर्ट आणि 6.5 इंचाचा FHD+ डिस्प्ले व 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.