ग्राहकांचे Smartphone खरेदी करताना ऑडिओच्या दर्जाला कॅमेराहून अधिक प्राधान्य; सीएमआर अभ्यासात निष्कर्ष

भारतीय त्यांच्या पुढील स्मार्टफोनच्या खरेदीसाठी ऑडिओच्या दर्जाला सर्वाधिक महत्त्व देत आहेत, ऑडिओ दर्जाला १०० पैकी ६६ गुण मिळाले, त्यापाठोपाठ बॅटरी लाइफला ६१ तर कॅमेराला ६० गुण मिळाले.

मुंबई : सायबर मीडिया रिसर्चने (सीएमआर) केलेल्या नवीन अभ्यासानुसार, भारतीय ग्राहक आता ऑडिओ (audio) च्या दर्जाला(quality) स्मार्टफोन (smartphone) खरेदीत कॅमेरा (camera) व बॅटरी लाइफ (battery life) यांहून अधिक महत्त्व देऊ लागले आहेत. स्मार्टफोन निवडताना ऑडिओ दर्जा हा सर्वांत महत्त्वाचा निकष असल्याचे, सर्व वर्गांतील चारपैकी एका वापरकर्त्याने नमूद केले आहे. आत्तापर्यंत प्रथमच ग्राहक ‘ऑडिओ दर्जा’ला एवढे महत्त्व देत आहेत. कदाचित घरामध्ये अनेक तास एकट्याने घालवायला लागल्यामुळे या मागणीला चालना मिळाली आहे. ऑडिओच्या दर्जाला अधिक महत्त्व देऊन त्यांना अधिक चांगले, मग्न करून टाकणारे अनुभव हवे आहेत.

“स्मार्टफोन कॅमेरा आणि बॅटरीमधील प्रगती बघता, त्यात जो काही उद्योगक्षेत्रातील आघाडीचा नवोन्मेष आहे त्याबाबत ग्राहक समाधानी आहेत असे मला वाटते. दुसऱ्या बाजूला सध्या सगळे काही घराशी बांधले गेल्यामुळे ग्राहक ऑडिओ दर्जाबाबत अधिकाधिक जागरूक होत आहेत, त्याकडे लक्ष देत आहेत. या नवीन सामान्य परिस्थितीत संवादापासून ते कंटेण्ट उपभोगापर्यंत सर्वंच बाबींसाठी ते ऑडिओला अधिक महत्त्व देत आहेत,” असे सीएमआरच्या इंडस्ट्री कन्सल्टिंग ग्रुपचे प्रमुख सत्या मोहंती म्हणाले.

सीएमआरच्या इंडस्ट्री इंटेलिजन्स ग्रुपचे प्रमुख प्रभू राम यांच्या मते, “अशा अभ्यासांतील रोचक संशोधने आम्हाला ग्राहकांच्या स्मार्टफोन ऑडिओबद्दलच्या बदलत्या इच्छा समजून घेण्यासाठी एक आधाररेषा पुरवतात. ग्राहकांना आता कायमच अधिक चांगला आणि मग्न करून टाकणारा ऐकण्याचा अनुभव, कधीही आणि कुठेही पाहिजे आहे. सर्व ओटीटी उपभोग ते मोबाइल गेमिंग आणि अगदी यूजीसीपर्यंत सर्व यूज केसेसमध्ये ग्राहकांना उच्च दर्जाचा ध्वनी हवा आहे. त्यामुळेच डॉल्बीसारखे उद्योगक्षेत्रातील आघाडीचे नवोन्मेष असलेले ब्रॅण्ड आता चमकणार आहेत आणि ग्राहकांच्या इच्छा पूर्ण करणार आहेत.”

“व्हॉट ऑडिओ मीन्स फॉर इंडियन स्मार्टफोन युजर्स” या शीर्षकाच्या सीएमआर अभ्यासात भारतीय ग्राहकांचे त्यांच्या ऑडिओ उपभोगाच्या नमुन्यांनुसार तीन ढोबळ वर्गांत विभाजन करण्यात आले आहे:

डिजीटल नेटिव्ह्ज जे दर आठवड्याला २०हून कमी तास ऑडिओचा वापर करतात (३९ टक्के)

डिजीटल डिपेंडंट्स जे आठवड्याला १०-२० तास ऑडिओचा वापर करतात (४४ टक्के)

डिजीटल लॅगार्ड्स जे आठवड्याला १० तासांहून कमी काळ ऑडिओचा वापर करतात (१७ टक्के)

चित्रपट आणि संगीत या स्वरूपातील ऑनलाइन कंटेण्ट उपभोगात प्रचंड वाढ झाली आहे. कोठेही घेऊन जाण्याजोग्या

स्मार्टफोन्समुळे ही वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत परवडण्याजोग्या आणि किमतीचा पुरेपूर मोबदला देणाऱ्या स्मार्टफोन्समुळे कोठेही जाताना-येताना तसेच घरी असताना कंटेण्टचा उपभोग वाढला आहे.

भारतीयांना व्हिडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सवर सर्व प्रकारांमध्ये बिंज वॉचिंग करायला आवडते. यामध्ये एपिसोडिक कंटेण्ट तसेच सोशल मीडियावर वापरकर्त्यांनीच तयार केलेल्या व्हिडिओ कंटेण्टचा समावेश असतो.

कोरोना साथीच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सना वाढत्या प्रेक्षकसंख्येचा आणि नवीन सबस्क्रायबर्सचा लाभ मिळत आहे.

तीन गटांपैकी डिजिटल नेटिव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर(ott platforms) अधिकाधिक वेळ घालवतात आणि स्मार्टफोन खरेदी करताना ऑडिओचा दर्जा त्यांच्यासाठी सर्वांत महत्त्वाचा असतो.

या अभ्यासातील काही अत्यंत रोचक संशोधने येथे दिली आहेत:

ऑडिओ दर्जा महत्त्वाचा. भारतीयांच्या दृष्टीने त्यांचा पुढील स्मार्टफोन खरेदी करताना ऑडिओ दर्जा हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा आहे. या निकषावर ऑडिओ दर्जाने १०० पैकी ६६ गुण प्राप्त केले आहेत.

त्या खालोखाल बॅटरी लाइफने ६१, तर कॅमेराने ६० गुण प्राप्त केले. स्मार्टफोन वापरकर्ते बहुतांशी खालील माध्यमांतून ऑडिओचा उपभोग घेतात.

लोकप्रिय ऑडिओ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर संगीत ऐकणे (९४%),

व्हिडिओ बघणे- चित्रपट, ओटीटी कंटेण्ट किंवा वापरकर्त्यांनी सोशल नेटवर्क्सवर तयार केलेला कंटेण्ट (९६%).

पसंतीच्या ऑडिओ ॲक्सेसरीजमध्ये इअरप्लग्ज आणि इअरबड्जचा समावेश होतो. ७८ टक्के ग्राहक वायर्ड इअरप्लग्जना पसंती देतात, तर ६५ टक्के इअरबड्जचा वापर करतात.

व्हिडिओ ग्रहण ग्राहकांच्या व्यक्तित्वानुसार बदलते. उदाहरणार्थ, डिजिटल नेटिव्ह्ज अल्प कालावधीच्या व्हिडिओजना प्राधान्य देतात (३८ टक्के), तर डिजिटल लॅगार्डसचे प्राधान्य दीर्घ कालावधीच्या व्हिडिओंना असते (२३ टक्के).

वेगवेगळ्या ग्राहक व्यक्तिंसाठी अधिक चांगल्या ऑडिओ अनुभवाचा अर्थ वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ, डिजिटल लॅगार्डससाठी आवाज व संवादांची स्पष्टता हा अधिक चांगला ऑडिओ अनुभव असतो (६९ टक्के), तर डिजिटल नेटिव्ह्ज मग्न करून टाकणाऱ्या अनुभवाला चांगला ऑडिओ अनुभव मानतात (६१ टक्के).

दर आठ वापरकर्त्यांपैकी पाच (६२ टक्के) गेमिंगदरम्यान ऑडिओचा वापर करतात. त्यातील ७२ टक्के वापरकर्ते ऑडिओबाबत समाधानी असतात.

भारतीयांना ऑडिओतील समस्यांची सवय असते. दर सात वापरकर्त्यांपैकी तिघांना स्मार्टफोन ऑडिओमध्ये नियमितपणे काही समस्या जाणवतात. या समस्या खालीलप्रमाणे :

ऑडिओ खूपच मृदू असणे (३३%)

ऑडिओ खूपच मोठा असणे (३०%)

विपर्यस्त ऑडिओ (२४%)