Whatsapp युजर्ससाठी वाईट बातमी, कधीच मिळणार नाही हे उत्तम फीचर

सर्वाधिक लोकप्रिय मेसेंजिंग ॲप प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर युजर्स खूप वेळ एका उत्तम फीचरच्या प्रतिक्षेत होते पण हे फीचर आता कधीच मिळणार नाही. व्हॉट्सॲपवर वर्ष 2018 पासूनच व्हेकेशन मोड फीचरची टेस्टिंग सुरू होती पण याची डेव्हलपमेंट कायमस्वरुपी थांबविण्यात आली आहे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही गोष्ट समोर आली आहे.

मुंबई : मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपवर युजर्सला खूप सारे नवीन फीचर्स मिळत असतात पण कंपनी युजर्सच्या मागणीनुसार नवीन ऑप्शन्स ॲड करणार हे नियमित घडेलच असं नाही. व्हॉट्सॲपवर गेल्या काही दिवसांपासून बीटा युजर्ससोबत ॲपवर ‘Vacation Mode’ची टेस्टिंग सुरू होती पण हे फीचर युजर्सला कधीच मिळणार नाही. वर्ष 2018पासूनच मेसेजिंग सर्व्हिस या ॲपला अँड्रॉइड आणि iOS युजर्सच्या वापरासाठी याची टेस्टिंग सुरू होती पण आता ही टेस्टिंग पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.व्हॉट्सॲप वर व्हेकेशन मोड फीचरच्या मदतीने मेसेजेसला पूर्णपणे इग्नोर आणि चॅट्स हाइड करता येणार आहे, अशी बाब समोर आली होती. म्हणजेच युजर्स या ॲपपासून कायमस्वरुपी स्वत:ची सुटका करून घेणार होते. व्हॉट्सॲपमध्ये होणारे बदल आणि नवीन अपडेट्सवर लक्ष ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्म WABetaInfo ने नवीन अहवालात नमूद केल्याप्रमाणे व्हॉट्सॲपने आता या फीचरवर काम करणं बंद केलं आहे. हे फीचर आजवर टेस्टिंग स्वरुपातच होतं पण आता यावर पुढे काहीही काम होणार नाही.

बीटा युजर्सलाही मिळणार नाही  अपडेट्स

व्हेकेशन मोडची जवळपास दोन वर्षांपासून चाचणी सुरू होती, पण बीटा युजर्सलाही याचा वापर करता येत नव्हता. जर हे फीचर रोलआउट केलं असतं तर यात ‘आर्काइव्ह चैट्स इग्नोर’ चा ऑप्शन युजर्सला मिळाला असता. हे फीचर व्हॉट्सॲप सेटिंग्सच्या नोटिफिकेशन्स सेक्शनमध्ये युजर्सला मिळणार होतं. अशाप्रकारे युजर्सला व्हॉट्सॲपपासून कायमस्वरुपी स्वत:ला दूर ठेवणे शक्य होणार होते आणि व्हेकेशनवर असलेल्या काळात सर्व चॅट्स आणि मेसेजेस पूर्णपणे इग्नोर करणे शक्य होणार होते.

फक्त म्युट करण्याचाच मिळणार ऑप्शन

व्हॉट्सॲपवर मिळणारे आर्काइव्ह फीचर चॅट्सला म्युट करण्यापेक्षा वेगळे आहे कारण म्युट करण्यात आलेले चॅट्स ॲपमध्ये त्याच क्रमाने दिसतात. या चॅटमध्ये येणारे मेसेजेसचे नोटिफिकेशन्स युजर्सला दिसत नाहीत पण ॲप कायमस्वरुपी चॅट्स म्युट करण्याचा ऑप्शन लवकरच देणार आहे.