सावधान! गुगल पेमेंट करताय, १ जानेवारीपासून बदलणार ‘हे’ नियम; वाचा सविस्तर

गुगल पे (GPay) वापरणाऱ्या युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनी लवकरच आपल्या नियमांत बदल करणार आहे. या बदलाचा परिणाम १ जानेवारीपासून करोडो युजर्सवर होणार आहे.

    Google Pay Rule Change : कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून कॉन्टॅक्टलेस पेमेंट्सचा सुरक्षित पर्याय म्हणून देशातील अधिकाधिक लोक डिजिटल पेमेंटकडे वळले आहेत. यामुळेच, त्याच्याशी संबंधित अनेक ॲप्स (Digital Payment Apps) अधिकृत म्हणून देखील जारी करण्यात आली आहेत, ज्यांचा वापर देखील मोठ्या प्रमाणात होतो आहे. यामुळे तुम्ही डिजिटल वॉलेटद्वारे कुठेही पैसे देऊ शकता, जे सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चांगले आहे. देशात गुगल पेचे युजर्स जास्त आहेत. गुगल पे वापरणाऱ्या युजर्ससाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. कंपनी लवकरच आपल्या नियमांत बदल करणार आहे. या बदलाचा परिणाम १ जानेवारीपासून करोडो युजर्सवर होणार आहे.

    कोण-कोणत्या गोष्टींवर होणार परिणाम?

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर गुगलचे (Google) काही नियम बदलले जात असल्याची चर्चा आहे. ऑनलाइन पेमेंट करणाऱ्या युजर्सवर या बदलाचा परिणाम होईल. हे नवीन नियम गुगल जाहिराती (Google Ads), युट्युब (YouTube), गुगल प्ले स्टोअर (Google Play Store) आणि गुगल पे (Google Pay) इत्यादींसह सर्व गुगल सेवांवर लागू होणार आहेत.

    नव्या नियमाची १ जानेवारीपासून होणार अंमलबजावणी

    नवीन नियमाची १ जानेवारी २०२२ पासून अंमलबजावणी होईल आणि त्यानंतर गुगल आपल्या ग्राहकांच्या कार्ड तपशीलांचा डेटा सेव्ह करणार नाही. आत्तापर्यंत गुगल आपल्या ग्राहकांच्या पेमेंटशी संबंधित सर्व डिटेल जसे की कार्ड नंबर, एक्सपायरी डेट जतन करत असे. पण भविष्यात असे होणार नाही. हा नियम लागू झाल्यानंतर, युजर्सना गुगल पेवरून पेमेंट करताना त्यांचे कार्ड डिटेल पुन्हा एंटर करावे लागतील. त्यानंतरच तुम्हाला पेमेंट करण्याची मुभा असेल. गुगल पेच्या मॅन्युअल ऑनलाइन पेमेंटच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

    गुगलचे नवीन नियम लागू झाल्यावर त्याचा थेट परिणाम गुगल पे वापरणाऱ्या लाखो युजर्सवर होईल. कारण यानंतर ते त्यांचे कार्ड तपशील सेव्ह करू शकणार नाहीत आणि पेमेंट करण्यापूर्वी त्यांना पुन्हा पुन्हा डिटेल्स टाकावे लागतील. याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कार्डची एक्सपायरी डेट आणि कार्ड नंबर दोन्ही लक्षात ठेवावे लागतील. तुम्ही MasterCard किंवा Visa वापरत असाल तर, तुम्हाला कार्डचे तपशील नवीन फॉरमॅटमध्ये सेव्ह करण्यासाठी अधिकृत करणे आवश्यक आहे.