google play and app stores removes seven malicious apps delete them from your android and iphone immediately
गुगल आणि ॲपल ॲप स्टोरवरून हटवले ७ धोकादायक ॲप्स, फोनमधून करा डिलीट तात्काळ

या ॲप्सला गुगल प्ले स्टोर (google play store) आणि ॲपल ॲप स्टोर (apple app store) मधून अँड्रॉइड (android) व आयफोन युजर्स (iphone users) कडून २४ लाख वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. या ॲप्सच्या डेव्हलपर्स (developers)ने आतापर्यंत ५०००००० डॉलरची कमाई केलेली आहे.

नवी दिल्लीः मॅलिशस ॲप्स (Malicious apps) संबंधी लागोपाठ माहिती समोर येत आहे. आता Avast च्या सायबर सिक्युरिटी रिसर्चर टीम (cyber security resercher team) ने ७ मॅलिशस ॲडवेयर स्कॅम्स ॲप्सची माहिती उघड केली आहे. या ॲप्सला गुगल प्ले स्टोर (google play store) आणि ॲपल ॲप स्टोर (apple app store) मधून अँड्रॉइड (android) व आयफोन युजर्स (iphone users) कडून २४ लाख वेळा डाउनलोड करण्यात आलेले आहे. या ॲप्सच्या डेव्हलपर्स (developers)ने आतापर्यंत ५०००००० डॉलरची कमाई केलेली आहे. या ॲप्सला प्रसिद्ध टिकटॉक (tiktok) आणि इन्स्टाग्राम (instagram) सारख्या प्रोफाइल्सने डाउनलोड करण्यात आले आहे.

अवास्टवर एका ब्लॉग पोस्टच्या माहितीनुसार, टीमने ३ अशा प्रोफाईलची माहिती लावली आहे. जे टिकटॉकवर मॅलिशस ॲप्सला वेगाने डाउनलोड करण्यासाठी पुश करत होते. टिकटॉकवर अशा प्रोफाईलवर ३ लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. रिसर्चर्सने इंस्टाग्रामवर एक अशा प्रोफाइलची माहिती उघड केली आहे. यात एकावर ५००० हून जास्त फॉलोअर्स आहेत. अवास्टने अशा ७ ॲप्सची माहिती ॲपलने गुगलला दिली आहे.

ZDNet च्या रिपोर्ट मध्ये सांगितले आहे की, ThemeZone, Shawky App Free, Shock My Friends, Ultimate Music Downloader, Free Download Music ला गुगल प्ले स्टोर वरून हटवले आहे. या दरम्यान, Shock My Friends – Satuna, 666 Time, ThemeZone, Live Wallpapers आणि shock my friend tap roulette v ॲप्स ला ॲपल ॲप स्टोरमधून रिमूव्ह केले आहे.

अवास्टच्या टीमने या ॲप्सला गेम्स, वॉलपेपर आणि म्युझिक डाउनलोड ॲप्स म्हणून डेव्हलप केले आहे. तसेच तरुणांना लक्ष्य केले आहे. वारंवार ॲप शो करीत होते. यामुळे युजर्संना अतिरिक्त सर्विससाठी २ ते १० डॉलरपर्यंत चार्ज द्यावा लागत होता. यात काही जाहिराती सुद्धा दाखवल्या जात होत्या. यातून ते पैसे कमावत होते.

अवास्टच्या थ्रेट अनालिस्ट जॅकब वावरा यांनी सांगितले की, ज्या ॲप्सला आम्ही शोधून काढले आहे. ते गुगल आणि ॲपल ॲप पॉलिसीजचे उल्लंघन करीत होते. गुगल आणि ॲपल ॲप स्टोरमधून हटवले आहे. तुमच्या मोबाइलमध्ये हे ॲप्स असतील तर तात्काळ डिलीट करा, असे सांगण्यात आले आहे.